Navaratri 2023 in Marathi | शारदीय नवरात्री कधी आहे? मुहूर्त, घटस्थापना घागरी फुंकणे

Navratri kab hai
नवरात्री २०२३

भारतात नवरात्र उत्सव हा सण खूप मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. हा सण गणपती उत्सव झाल्यानंर काही दिवसात येतो.
नवरात्र ह्या शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा आहे. हिंदू धर्मात ह्या सणाला खूप महत्व आहे.

शारदीय नवरात्री उत्सव २०२३ | Sharadiya Navaratri 2023 in Marathi

तिथी प्रमाणे जर बघितलं, नवरात्रीचा काळ हा अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नववी इथपर्यंत असतो.
या लेखात आपण जाणून घेऊया शारदीय नवरात्री उत्सवाची माहिती,  महत्व आणि पौराणिक कथा. 

नवरात्र उत्सव माहिती | Navaratri Information

अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना झाल्यावर नवरात्र सुरू होते. हा उत्सव पुढे नऊ दिवस असतो.
पहिल्याच दिवशी त्या घटापासून थोड्या अंतरावर धान्य पेरतात व दररोज त्यावर थोडे थोडे पाणी शिंपडतात.
सप्तशती ग्रंथाचा पाठ सुरू करतात घटापाशी अहोरात्र नंदादीप तेवत ठेवला जातो. घटावर दररोज फुलांची एक माळ टांगण्यात येते.
काही ठिकाणी घटावर टांगवयाच्या माळांमध्ये दररोज एकेका संख्येने वाढ केली जाते. 

अश्विन शुद्ध प्रतिपदेस देवीच्या देवळात अगर कुलाचारानुसार घरातही घटस्थापना करतात.
याच काळात नववी नवमीपर्यंत देवी पुढे सप्तशतीचा पाठ करतात. अहोरात्र दिवे लावून देवीपुढे फुलांच्या माळा बांधतात.
अश्विन शुद्ध पंचमीला काही लोक ललिता देवीची पूजा करतात या दिवसाला ‘ललिता पंचमी’ असेही म्हणतात. 

नवरात्राची कथा

या नवरात्र उत्सवाबद्दल एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महिषासुर नावाचं एक राक्षस होता.
तो अतिशय शक्तीशाली आणि उन्मत्त बनला होता. तो स्वतःच्या शक्तीच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर मनुष्यांना आणि देवांना खूप त्रास देत होता.
असे करून त्याने देव व मनुष्यांना बेजार करून सोडले होते.
त्यामुळे भयभीत झालेल्या देवांनी ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्यांची आराधना केली. ब्रम्हा, विष्णू आणि महेश याना महिषासुराचा राग आला.
त्यातून एक दैवी शक्ती निर्माण झाली. हिच ती जगदंबा. 

देवीने अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सतत नऊ दिवस महिषासुराशी घनघोर युद्ध केले.
नवव्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी संध्याकाळी देवीने महिषासुराचा वध केला.
विजयी झालेली देवी, दशमी च्या दिवशी देवलोकी परतली. म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात.

गरबा

गरबा हा शब्द गर्भ दीप या शब्दापासून तयार झाला आहे. 
गर्भ दीप म्हणजे एका मातीच्या माठामध्ये लहान लहान छिद्रे करून त्याच्या आता दिवा तेवत ठेवला जात.
त्याभोवती घेर घालून स्त्रिया पारंपरिक नृत्य करतात. 

नवरात्री उत्सव मध्ये गरबा नृत्य आणि त्याचे महत्व

हे नृत्य देवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते अशी मान्यता आहे. ह्या नाचमध्ये गरबा करताना तीन टाळया वाजवण्याची प्रथा आहे.

ह्या तीन टाळया ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना समर्पित करून त्यांच्याविषयी भक्ती दाखवण्याची हि पद्धत आहे.
सुरवातीला फक्त स्त्रिया गरबा करत असत. कालातंराने स्त्री पुरुष सर्वच गरबा नृत्यामध्ये भाग घेतात आणि त्याचा आनंद घेतात.

नवरात्रीचे नऊ दिवस गरबा नृत्य केले जाते. टाळ्या आणि टिपऱ्या वाजवून गरबा गरबा केला जातो. 

गुजरात मधील नवरात्री आणि गरबा उत्सव

गुजरात मध्ये नवरात्रीत गरबा खेळणे हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
या नृत्याचे तेथील लोकांना बेसुमार आकर्षण आहे. गुजरात मध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठ्या धुमधडाक्यात हा उत्सव साजरा केला जातो.
स्वातंत्र्याआधी गरबा फक्त गुजरात मधेच खेळाला जायचा. नंतर भारतात हा उत्सव सगळीकडेच साजरा केला जातो.
सार्वजनिक मंडळामार्फत गरब्याचे आयोजन करून, दिग्जज व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते.

नवरात्र पूजा

नवरात्रात नऊ दिवस रोज वेगवेगळ्या देवीच्या रूपांना पुजले जाते. जाणून घेऊया कोणत्या दिवशी कुठल्या देवीची पूजा केली जाते.

नवरात्रीचे 9 दिवस आणि देवाच्या नऊ रूपांची पूजा

  1. पहिला दिवस – शैलपुत्री देवीची पूजा – 15 ऑक्टोबर 2023
  2. दुसरा दिवस – ब्रह्मचारिणी देवीची पूजा – 16 ऑक्टोबर 2023
  3. तिसरा दिवस – चंद्रघंटा मातेची पूजा – 17 ऑक्टोबर 2023 
  4. चोथा दिवस – कुष्मांडा देवीची पूजा – 18 ऑक्टोबर 2023
  5. पाचवं दिवस –  स्कंदमातेची पूजा – 19 ऑक्टोबर 2023
  6. सहाव्वा दिवस –  कात्यायनी देवीची पूजा – 20 ऑक्टोबर 2023
  7. सातवा दिवस –  कालरात्री देवीची पूजा – 21 ऑक्टोबर 2023
  8. आठवा दिवस –  सिद्धिदात्री देवीची पूजा – 22 ऑक्टोबर 2023
  9. नववा दिवस –  महागौरी ची पूजा – 23 ऑक्टोबर 2023
  10. दहावा दिवस – दसरा, विजयादशमी आणि विसर्जन

नवरात्रात घागरी फुंकणे

महालक्ष्मी पूजनाचे एक वेगळे व्रत आहे. या व्रतामध्ये तांदळाच्या पिठाच्या उकडीचा मुखवटा बनवला जातो.
त्यापासून देवीची मूर्ती बनवली जाते. आजकाल तयार फायबर ची मूर्ती वापरली जाते. देवीला विविध आभूषणे घातले जातात.
लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे स्त्रिया हे व्रत एकत्रित पणे करतात. या स्त्रियांना वशेळ्या असे म्हटले जाते.
कारण त्यांनी वसा घेतलेला असतो म्हणून त्या वशेळ्या. विस्तवावर धूप जाळून त्यावर घागर उलटी ठेवली जाते.
त्यामध्ये धूर भरून अशी हि घागर घेऊन देवीसमोर, हि घागर फुंकत नृत्य केले जाते.
प्रत्येक वसा घेतलेल्या स्त्रियांनी कमीत कमी पाच वेळा हि घागर फुंकली पाहिजे अशी प्रथा आहे.
त्याचबरोबर देवीची आरती, भजने केले जातात. रात्री १२ वाजून गेल्यावर देवीची आरती करतात. बाकी लोक येऊन देवाचे दर्शन घेतात.
हे मुखवटे पहाटे पाण्यात विसर्जित केले जातात.

नवरात्रीचे रंग २०२३

Navratri colours 2023

विचारले जाणारे प्रश्न | Frequently asked questions

शारदीय नवरात्र कधी आहे? तारीख आणि तिथी २०२३ | When Sharadiya Navaratri start in 2023

वर्ष २०२३ मध्ये शारदीय नवरात्र रविवार 15 ऑक्टोबर 2023 या तारखेला सुरु होणार आहे, आणि मंगळवार 23 ऑक्टोबर 2023 रोजी संपत आहे. त्याचबरोबर 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे.

आश्विन प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रात्री 11.24 वाजेपासून ते 15 ऑक्टोबर रात्री 12.32. त्यामुळे उदय तिथी नुसार शारदीय नवरात्र हे 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होत आहे.

नवरात्रात कलश स्थापना कधी आहे? | Kalash Stapana

शारदीय नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच पहिल्या दिवशी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.44 ते दुपारी 12.30 पर्यंत कलश लावण्याचा शुभ मुहूर्त आहे. अशा स्थितीत कलश उभारण्यासाठी यंदा अवघा ४६ मिनिटांचा अवधी राहणार आहे.

गरबा म्हणजे काय?

गरबा हे गुजरात चे एक विशेष लोक नृत्य आहे. गर्भ दीप म्हणजे एका मातीच्या घड्यामध्ये छिद्रे करून त्याच्या आता दिवा लावला जातो. त्याभोवती गोल करून टाळ्या वाजवत किंवा टिपऱ्या वाजवत पारंपरिक नृत्य केले जाते. त्याला गरबा म्हटले जाते. गरबा हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. नवरात्रात नऊ दिवस गरबा उत्सव साजरा केला जातो.

नवरात्रातील नऊ रंग कोणते आहेत?

नारंगी, पांढरा, लाल, गडद, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, जांभळा, मोरपिशी आणि हिरवा. हे नवरात्रातील नऊ दिवसांचे रंग आहे. नवरात्रात प्रत्येक दिवशी ठरवलेल्या रंगाने सजावट केली जाते आणि स्त्रिया त्या रंगाचे कपडे परिधान करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *