आपल्या रात्रीच्या झोपण्याच्या स्थितीचा आपल्या दिनचर्येवर होणारा परणाम
आपल्या रात्रीच्या झोपण्याच्या स्थितीचा आपल्या दिनचर्येवर, मन:स्थितीवर् मोठा परिणाम होतो, असे वास्तुशास्त्र मानते.
रात्री झोप नीट लागत नसेल, प्रयत्न करूनही मध्यरात्रीपर्यंत झोपच येत नसेल तर, आपली झोपण्याची दिशा चुकीची आहे, असा त्याचा अर्थ होतो.
1) उत्तर दिशेला डोके आणि दक्षिण दिशेला पाय करून झोपणे अध्यात्मिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही चुकीचे आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथांत दक्षिण दिशा ही ‘यमाचे स्थान ‘ मानाली जाते. त्यामुळे या दिशेस पाय करून झोपणे हे यमलोकी जाण्याचे प्रतीक आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून:
वैज्ञानिक दृष्टिकोनानूसार उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे चुंबकीय (magnetic) किरणे निरंतर वाहत असतात. उत्तरेस डोके केल्यास ही चुंबकीय किरणे, डोक्यात प्रवेश करून शरीरातील ऊर्जा आपल्याबरोबर वाहून नेत. त्यामुळे ती ऊर्जा व्यर्थ वाया जाते. त्यामुळे झोप नीट लागत नाही व दुसऱ्या दिवशी माणसाची चिडचिड होते. या स्थितित झोपल्याने उच्च रक्तदाब (high blood pressure), कमी रक्तदाब (low blood pressure) या शारीरीक तक्रारीही उद्भवू शकतात.
2) दक्षिणेस डोके व उत्तरेस पाय ही झोपण्याची सर्वाधिक चांगली स्थिती आहे. कारण, उत्तरेला पाय करून झोपणे म्हणजे संप्पतिचा स्वामी कुबेराला शरण जाणे होय. अशा व्यक्तीवर लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून:
झोपण्याची ही स्थिती योग्य असण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे, उत्तर ध्रुवातून निघणारी चुंबकीय किरणे उत्तर दिशेला पाय करून झोपलेल्या व्यक्तीच्या पायातून तिच्या शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे शरीरातील संपूर्ण ऊर्जा व्यर्थ न जाता शरीरातच साठवून् ठेवली जाते.
3) याशिवाय, पूर्वेला डोके करून झोपणेही बऱ्यापैकी शुभ समजले जाते. परंतू पश्चिमेला मात्र कधीही डोके करून झोपू नये. त्यामुळे आजारपण येते. अपत्त्यांना संकटांना तोंड द्यावे लागते.
3) आग्नेय किंवा ईशान्य दिशेला बेडरूम कधीही बांधू नये. त्यामूळे पती-पत्नीमधे तीव्र स्वरुपाचा तणाव, टोकाचे मतभेद निर्माण होतात.