गोल्ड फिश टॅंक वास्तुनियम – fish tank
फिश टॅंक चा आरोग्य साठी फायदा
बरेच लोक आपल्या घरी फिश टॅंक ठेवतात, काही लोकांना त्याची आवड असते. फिश टॅंक घरी ठेवल्याने रक्तदाब नॉर्मल राहण्यास मदत होते. मास्यांची संथ हालचाल बघून त्यात माणूस बाकी सगळा राग / क्रोध सर्व काही विसरून ते बघण्यात रमून जातो.
चला तर मग आपण या लेखात आज जाणून घेणार आहोत फिश टॅंक आणि गोल्डफिश मास्याचे वस्तू च्या दृष्टीने महत्व.
सुख आणि समृद्धी साठी फिश टॅंक चा उपयोग
घरातील फिशटॅंक मध्ये गोल्डफिश मासे ठेवणे हे सुख आणि समृद्धीचे, आणि भरभराट वाढविण्याचा उत्तम उपाय आहे. आपल्या घरातील फिश टॅंक मध्ये ९ मासे असले पाहिजे. त्या मास्यांपैकी ८ मासे हे लाल किंवा सोनेरी रंगाचे आणि एक मासा काळ्या रंगाचा असावा. या गोल्डफिश मास्यांपैकी जर एखादा मासा मेला तर तो मेलेला मासा काढून त्या जागी नवीन गोल्ड फिश ठेवावा, मेलेला सोनेरी मासा हा आपल्या बरोबर दुर्भाग्य घेऊन जाते, असे मानतात कि घरातील एखाद्या व्यक्तीच्या जीवाला येणार धोका त्यामुळे टळतो.
गोल्डफिश मास्यांसाठी उत्तम खोली
गोल्डफिश माशांचा टॅंक आपल्या बेडरूम मधे, स्वयंपाकघरात कधीही ठेऊ नये. यामुळे आपल्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. दिवाणखाना म्हणजेच घराचा हॉल हे माशांचा टॅंक ठेवण्याचे सर्वात सुयोग्य आणि उत्तम स्थान आहे.
माशांचा टॅंक ठेवण्याची योग्य दिशा
दिवाणखान्यात माशांचा टॅंक ठेवायला पूर्व, आग्नेय आणि उत्तर दिशा आहेत. पाणी असलेली वस्तू जर योग्य स्थानावर ठेवली तर ती भाग्य उजळण्यासाठीही खूपच लाभदायक ठरते. परंतू जर ती वस्तू अयोग्य स्थानावर ठेवली गेली असेल तर ती खूपच हानिकारक ठरू शकते. आपण आपल्या घराच्या मूख्य दरवाजा च्या उजव्या बाजूस चुकूनही माशांचा टॅंक ठेऊ नका. यामुळे घरातील पुरुषाची नजर परस्त्रीकडे जाते.जिवंत मासे असलेल्या टैंक ऐवजी निळ्या पाण्यामध्ये उडी घेणाऱ्या डॉल्फिनचे चित्रही आपण लावू शकता. परंतू जिवंत गोल्डफिश टॅंक ठेवणे उत्तमच असतें.
शयनगृहात माशांचा टँक असता कामा नये
शयनगृहात पाणी असणारी कोणतीही वस्तू म्हणजे माशांचा टॅक-माशांची छोटी बरणी किंवा झऱ्याचे वा समुद्रकिनाऱ्याचे चित्र असता कामा नये. यामुळे पती-पत्नीच्या आपसातील संबंधांवर खूपच वाईट प्रभाव पडतो. जर आपल्या शयनगृहात पाण्याचे भांडे वा चित्र असेल तर ते तेथून दूर करावे. कधी-कधी कारकिदींचे क्षेत्र (उत्तर दिशा) शयनगृहाच्या भागात समाविष्ट होते. अशा परिस्थितीत शयनगृह पाण्याच्या वस्तूंनी नव्हे तर धातूंच्या वस्तूंनी समृध्द करावे