चेहऱ्यावरील सुरकुत्या
आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात. मनावर आलेल्या ताणामुळे चेहऱ्यावरील तेज कमी होते.
डोळ्याखाली काळी वर्तुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या अथवा मुरमा किंवा पुटकुळ्यांचा त्रास होऊ शकतो.
अशा वेळेला काही घरगुती उपाय करून किंवा काही सोप्या पद्धतीने आपण आपल्या चेहऱ्यावरील तेज परत आणू शकतो
आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवू शकतो. यासाठी खाली काही वेगवेगळे उपाय दिले आहेत.
हे सगळे उपाय आपण घरात असलेल्या पदार्थांचा वापर करून सोप्या पद्धतीने करू शकतो.
चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्याचे उपाय:
उपाय
- शिजवलेल्या पपईचा तुकडे करून चेहऱ्यावर घासा किंवा गर काढून चेहऱ्याला लावा. काही वेळानंतर चेहरा धुवा.
काही दिवस असे सतत केल्यास सुरकुत्या दूर होतात. मळ, स्पॉट्स नष्ट होतात आणि मुरुमांचा नाश होतो. चेहरा उजळतो. - रोज सकाळी जर आपण भुकेल्या पोटी सफरचंद खाल्ले आणि त्यावर दूध प्यायले. तर पुढील दोन महिन्यात त्वचेचा रंग उजलेळ
आणि चेहऱ्यावर लाली वाढेल. - ३० ग्रॅम अजवाईन बारीक दळून घ्यावे, २५ ग्रॅम दह्यात मिसळून घ्या. रात्री मुरुमा वर लावावे.
सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.
मुरुम किंवा पुटकुळ्या निघून जातील. आणि चेहरा सुंदर दिसू लागेल. - जिरे पाण्यात उकळून घ्यावे. आणि त्या पाण्याने तोंड व्हावे. चेहरा सुंदर दिसू लागेल.
- कडाक उन्हात उष्णतेमुळे त्वचेला इजा होऊ शकते किंवा त्वचा खराब होऊ शकते. त्वचेला कडक उन्हापासून,
उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी दूध किंवा दह्यामध्ये बेसनाचे पीठ मिसळून दाट मिश्रण बनवा.
सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर लावून ठेवा. चेहऱ्यावरील तेज वाढेल. - मसूर डाळ पाण्यात एवढी भिजवा की ती डाळ पाणी पूर्ण शोषून घेईल. मग त्याला दळून किंवा बारीक करून,
दुधात मिसळा आणि त्याचे व्यवस्थित मिश्रण बनवा. हे बनवलेले मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी दोनदा चेहऱ्यावर चोळा. - रात्री झोपताना जायफळ आणि काळी मिरी दुधात मिसळून चेहऱ्याला लावा. चेहरा सुंदर दिसेल.
- लिंबू, मध, बेसनाचे पीठ आणि तिळाचे तेल याचे उटने बनवून चेहऱ्याला लावल्यास. प्राकृतिक उजळता येऊन सुंदरता वाढते.
- आजकाल बऱ्याच लोकाकडे कोरफडीचे झाड असते. त्याचा गर काढून चेहऱ्याने लावल्याने ही खूप फरक पडतो.
याशिवाय जंक फूड, तेलकट पदार्थ खाणे वर्ज्य केले पाहिजे. आणि ताजे सकस अन्न घेतले पाहिजे. सगळे उपाय करूनही उपयोग होत नसेल, तर वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत योग्य. कारण काही वेळेस व्हिटॅमिन च्या कमतरतेमुळे किंवा अन्य कारणांमळे ही असे होऊ शकते.