नवीन मराठी उखाणे 2024 | Ukhane in marathi
आपल्या संस्कृतीचा एक रम्य आणि सुखद असा अनुभव म्हणजे नवीन लग्न झालेल्या जोडप्याने नांव घेणं. लग्न ठरल्यापासून ते पार पडेपर्यंत आणि त्यानंतरचे वर्षभरातील सण, सोहळे साजरे होईपर्यंत, नाव घेण्याच्या आग्रह केला जातो. अगदी आजच्या इंटरनेट काळातही नांव घेण्याची हि परंपरा, तिचा गोडवा पूर्वी इतकाच टिकून आहे. पण प्रत्येक वेळी नाव काय घ्यावे हा प्रश्न पडतो? अश्या जोडप्यांसाठी प्रत्येक वेळप्रसंगी घ्यायचे उखाणे आम्ही सांगणार आहोत.
Table of Contents
- बायकोनें नवऱ्याचें नांव घेण्याचे उखाणे / मराठी उखाणे नवरी साठी (Marathi Ukhane for female)
- नवऱ्याने बायकाचे नांव घेण्याचे पध्दत / मराठी उखाणे नवरदेवासाठी (Marathi Ukhane for male)
- विवाह ठरल्यानंतर / लग्नासाठी
- साखरपुडा चे उखाणे / साखरपुड्यासाठी उखाणे | Sakharpuda Ukhane
- हळदीसाठी उखाणे | Haldiche Ukhane
- विवाहाच्या वेळी
- वरमाला घातल्यानंतर / माळ घातल्यावर
- सप्तपदी साठी उखाणे | Saptapadi Ukhane
- घास भरवितांना चे उखाणे
- गृहप्रवेश चे उखाणे | Gruhapravesh Ukhane
- गृहप्रवेशा नंतर चे उखाणे
बायकोनें नवऱ्याचें नांव घेण्याचे उखाणे / मराठी उखाणे नवरी साठी (Marathi Ukhane for female)
या मध्ये बायकोने नवऱ्यासाठी (Ukhane for Husband) घ्यावयाचे उखाणे देण्यात आले आहेत.
- हरिश्चंद्र राजा रोहिदास पुत्र _______ च्या जीवावर घालते मंगळसूत्र
- सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरविला पिच्छा _______च्या जीवावर अखंड सौभाग्य मिळावे हीच माझी इच्छा
- आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे _______ हेच माझे अलंकार खरे
- बंधू प्रेमासाठी राज्यपद त्यागिले _______च्या नावाबरोबर गृहिणीपद स्वीकारिले
- इमारत बांधायला मंजूर लागतात कुशल _______ नाव घेते तुमच्याकरता स्पेशल
- पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा _______च्या नांवावर भरला सौभाग्याचा चुडा
- सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान _______च्या जीवावर मी आहे भाग्यवान
- राजहंस पक्षी शोभा देतो वनाला _______चं नांव घेते आनंद माझ्या मनाला
- कृष्णानें पण केला रुक्मिणीलाच वरीन _______च्या जीवावर आदर्श संसार करीन
- भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची _______नांव घेते पंगत बसली मित्रांची
- आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण _______ चे नाव घेऊन बांधते कंकण
- चांदीच्या वाटीत साखरभाताची _______ राव घ्या देते केशरी दूध
- अंबाबाईच्या देवळात बिलवरी आरसा _______ना घास घालते अनरसा
- रामाच्या देवळांत सोन्याची घाट _______ च्या जिवावर _______ चा थाट
- नाशिकच्या गंगेवर; चिरेबंदी घाट _______ च्या पंक्तीस _______ चा पाट.
- अलीकडे गंगा; पलीकडे गंगा, मध्ये टाकला दोर _______ राव थोर त्यांच्या हाती खेळे मोर.
- दारी होते कोनाडे त्यांत होती सळी, _______ ची बायको गुलाबाची कळी.
- शिक्षणाने विकसीत होत संस्कारित जीवन _______ च्या संसारात राखीन सर्वांच मन.
- किनखापांची गादी त्याला भरगच्ची लोड _______ चे बोलणे अमृतापेक्षां गोड.
- हरिद्वाराहून आला बाबा, त्याची दोन हात लांब दाढी _______ नी नेसायला आणली मला भरगच्ची साडी.
- शेराची सरी अच्छेराचे फासे, राजाच्या दरबारांत _______ राव खासे.
- चाफ्याची कळी फुलली बागेत, वास पसरला आसमंतात _______ राव माझ्या हृदयात.
- सुन मी _______ ची पत्नी झाले _______ रावांची, आता सुरू झाला संसार कमी नाही सुखाची.
- आई, बाप, बहिण, भाऊ, अशी आहेत माहेरची नाती सासरी पण मिळावीत प्रेमळ नाती आणि _______ रावांची प्रीती.
- लग्न झाल्यावर मुलगी होते माहेरची पाहुणी _______ रावांच्या घराची झाले मी गृहणी.
- दारी होता खांब त्याला आला घाम, उठा उठा _______ शेला करा लांब.
- मुगाच्या डाळीच्या खिचडीवर तुपाची धार _______ रावांचें नांव घेते _______ बाई नार.
- वाद्यांमध्ये सुरले वाद्य म्हणजे बीन _______ रावाचं चरणी झाले मी लीन
- झाला संध्या समय घरट्यात परतती पक्षांचे थवे _______ रावांच्या नावाने मिळाले जीवन नवे.
- इंद्रधनुष्यात असतात सप्तरंग _______ रावांच्या संसारात मी आहे दंग.
- इंद्रधनुचे रंग सात, गाण्याचे सूर सात _______ रावांची मिळाली साता जन्मांची साथ.
- निळ्या नभात चंद्राचा प्रकाश _______ रावांवर आहे माझा विश्वास
- नदी आहे, पर्वताची दुहिता _______ च्या साठी सोडते माहेर आता.
- प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे_______ रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे.
- सागराला आली भरती नदीला पूर _______ च्या साथीसाठी माहेर केली दूर.
- उखाण्यात उमटाव शब्दांचे लालित्य _______ रावांच्या नावाने बांधले मंगळसुत्र, त्यात आहे पावित्र्य.
- सौभाग्याचा अलंकार म्हणजे कांचेचे चुडे _______ रावाचें नांव घेते. मंगळागौरीपुढे.
- संगमरावरी देवळांत बसविली रामाची मूर्ति _______ रावाशी लग्न झालें, झाली इच्छापूर्ती.
- भोसल्यांची सून जिजाबाई धन्या _______ रावांचें नांव घेते _______ पंतांची कन्या.
- घनघोर पावसाच्या नंतर सूर्यकिरणे वाटतात हवीहवीशी _______ रावांच्या सहवासात सापडल्या चैतन्यराशी.
नवऱ्याने बायकाचे नांव घेण्याचे पध्दत / मराठी उखाणे नवरदेवासाठी (Marathi Ukhane for male)
या मध्ये नवऱ्याने बायकोसाठी (Ukhane for Wife) घ्यावयाचे उखाणे देण्यात आले आहेत.
- कपाटाच्या खणांत ठेवला पैका _______ चे नांव घेतो सर्वजणी ऐका.
- गंगेची वाळू चाळणीने चाळू, चल चल _______ आपण सारीपाट खेळूं.
- फुलांत फूल मदनबाण _______ माझी जीव की प्राण.
- घरोघरी त्याच परी. कोणाला सांगायचे काय? _______ चे नांव घेतो, पण माझ्याकडे बघत नाय.
- घटका गेली, पळे गेली, राम का म्हणना _______ नाव घेतो, पण थांबवा ठणाणा.
- भाजीत भाजी मेथीची _______ माझ्या प्रीतीची.
- आरशाची खोली तिथे सोन्याची दिवली माझ्या _______ ला पाहतांच तहान भूक निवली.
- कोवळी काकडी कुरकुर वाजे, काळी चंद्रकळा _______ला साजे.
- चंद्राला पाहून भरती येते सागराला _______ जोड मिळाली संसाराला.
- जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, _______ च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
- खडी साखरेचा खडा खावा तेव्हां गोड, _______ च्या रुपात नाहीं कुठेंच खोड
- पाण्याच्या हंड्यावर रुप्याचें झांकण _______ च्या हातांत हिऱ्याचें कंकण
- हिऱ्याचा कंठा मोत्याचा घाट _______ च्या हौशीसाठी केला सगळा थाट
- रुप्याची लोटी सोन्याची झारी असली काळीसावळी तरी _______ माझी प्यारी
- हत्तीच्या अंबारीवर मखमालीची झूल, _______ माझी नाजुक जसे गुलाबाचे फूल ।
- कपाळाचे कुंकू जशी चंद्राची कोर _______ च्या मदतीवर माझा सगळा जोर
- सायंकाळच्या आकाशाचा निळासर रंग _______ नेहमी घरकामांत दंग
- चौकोनी आरशाला वाटोळी फ्रेम माझ्या लाडक्या _______ वर माझें खरें प्रेम.
- गणपतीच्या सोंडेला शेंदूराचा रंग माझी _______ नेहमी घरकामांत दंग
- पुढें जाते वासरू मागून चालली गाय माझ्या _______ ला आवडते दुधावरची साय
- जाईच्या वेणीला चांदीची तार माझी _______ म्हणजे लाखांत सुंदर नार
- सोन्यांत सोने बावनकशी माझी _______ मस्तानीच जशी
- वसंत ऋतु येतांच कोकिळा गातात गोड, माझी _______ माझ्या तळहातावरची फोड
- कोरा कागद काळी शाई, _______ ला रोज देवळांत जाण्याची घाई
- दारी होते कोनाडे त्यांत होती पळी, माझी _______ व्यवहाराच्या बाबतीत अगडी खुळी
- तासगांवच्या गणपतीचा गोपूर बांधणारे होते कुशल , _______ चं नांव घेतो तुमच्याकरितां स्पेशल
- जाईजुईचा वेल पसरला दाट _______ च्या नोकरीमुळें पडत नाही गांठ.
- चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा _______ चं नाव घेतो माझी वाट सोडा.
- नांव नांव नांवाची काय बिशाद मी आहे घरी _______ गेली ऑफिसात.
- श्यामल वर्ण मेघांतून कोसळतात मोत्यांच्या सरी, _______ च नाव घेतो _______ च्या घरी.
- पान, सुपारी, कात आणि चुना याचा बनविला विडा _______ चे नाव घेतो वाट माझी सोडा.
- उगवला सूर्य मावळली रजनी, _______ चे नाव सदैव माझ्या मनी.
- आई वडील भाऊ बहिणी, गोकुळासारखे घर या सुखामध्ये _______ ची पडली भर.
- देशाचा कारभार करावा युक्तीनें _______ चं नांव घेतो मनापासून भक्तीनें.
- सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप _______ ला मिळाली आहे अनुरुप.
- नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री _______ आजपासून माझी गृहमंत्री.
- श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुची रंगत न्यारी, _______ च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी.
- बुद्धीबळाच्या पटावर हस्तीदंती प्यादी, _______ माझी जीवनसाथी.
- नावामध्ये आहे काय ? नका हट्ट करू, माझा उखाणा जुळत नाही _______ काय ग करू ?
विवाह ठरल्यानंतर / लग्नासाठी
- सायंकाळी देवघरात; निरंजन रोज लावते, _______ च्या साथीने; सुखी संसाराचे स्वप्न पाहते.
- सकाळ होताच पूर्वेला; सूर्यनारायण उगवेल, _______ च्या संसारात; भाग्य माझे खुलेल.
- धरतीला लाभला सूर्य; किनारा लाटेला मिळाला _______ च्या रुपाने; मला जीवनसाथी लाभला.
- शब्दांनी शोभतो अर्थ; स्वरांनीच सजतात सूर, _______ पासून आता; राहणार नाही दूर.
- आठवणींच्या सागरात डुलते; संसार स्वप्नांची नांव क्षणोक्षणी _______ कडे; मन घेते धाव.
साखरपुडा चे उखाणे / साखरपुड्यासाठी उखाणे | Sakharpuda Ukhane
- सनईच्या सुरांनी आज घर मंगल झालं, _______ भोवती मन; पिंगा घालू लागलं. _______
- आजपासून माहेराची; पाहुणी मी झाली, _______ च्या सहवासाची; ओढ मला लागली.
- हार देवाच्या गळचात; गजरा स्त्रीच्या केसात खुलतो, तसा _______ चा आणि माझा; जोडा शोभून दिसतो.
- हसू नका सख्यांनो; मस्तकी नीट रेखा बिंदी, गुपित सांगते _______ नी माझ्या; हाती रेखली मेहंदी.
- सोन्याच्या पावलांनी; क्षण आजचे आले, _______ नी माझ्या संसार स्वप्नात; सप्तरंग भरले.
हळदीसाठी उखाणे | Haldiche Ukhane
- हळदीच्या पिवळ्या रंगांने; कांती माझी सजली, _______ च्या स्वप्नात माझी; प्रत्येक रात्र रंगली.
- हळदीच्या स्पर्शाने माझी; काया रेशमी मोहरली, _______ ची प्रीत मनी; रुंजी घालू लागली.
- हळदीच्या सोहळ्याला; सख्या सगळ्या जमल्या, त्यांच्या थट्टेने _______ च्या; आठवणी मनी जागल्या.
- दुधात उगाळली हळद सख्यांनी; रेशमी हातांनी लावली, _______ च्या _______ ला; सोनेरी झळाळी देऊन गेली.
- गप्पा-गोष्टी, गाणी-उखाणे; हळदीची न्यारीच मजा, संसारस्वप्नात मी राणी _______ माझा राजा.
विवाहाच्या वेळी
- सनई चौघडा वादनाने; वातावरण सुरेल झाले, _______ च्या साथीने; माझे जीवन मधुर झाले.
- आजपासून आमचे; संसारपर्व सुरु होईल, _______ च्या साथीने जीवनाची; रंगत वाढत जाईल.
- अंगावरचा भर्जरी शालू; बिलगून म्हणतो मला _______ च्या संसारस्वप्नात; जीव खूप रमला.
- नको विरह नको प्रतीक्षा; नको आता झुरणे, ______________ च्या साथीने झाले; जीवन मधुर गाणे.
- मस्तकी अक्षतांची आज; जेव्हा बरसात झाली, _______ च्या संसारस्वप्नांनी; काया मोहरून गेली.
वरमाला घातल्यानंतर / माळ घातल्यावर
- वाट पहायला लावून मला; सुरविले तुम्ही फार, _______ आता स्वीकारा; माझ्या हातातला हार.
- स्वयंवरात सीतेने; श्रीरामाला वरले, _______ ना माला घालण्यास; मन आतुर झाले.
- नाही नुसती फुले; नाही नुसता हार, हा तर आहे माझा; _______ वरील प्रेमाचा आविष्कार.
- सनई चौघड्यांच्या स्वरांनी; मनी सुखाचे चांदणे फुलते, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने; _______ ना वरमाला घालते.
- विरह वाढविणारा अंतरपाट; क्षणात दूर झाला, _______ चा हार स्वीकारताच; जीव सुपाएवढा झाला.
सप्तपदी साठी उखाणे | Saptapadi Ukhane
- राजबिंड्या डौलाने, भाव भरल्या गतीने; सप्तपदी मी चालले, सात जन्मांचे रेशमी नाते; _______ शी जोडले.
- विवाह संस्कार पार पडले; _______ ला सोबत घेऊन, सप्तपदी चालताना माझे; तन मन आलं मोहरुन.
- सप्तपदीने गृहस्थाश्रमाचे; संस्कार मनी ल्यायले, _______ चा संसार फुलवायला; आतुर मी झाले.
- सप्तपदी झाली आता; होणे नाही दूर, _______ च्या संसारात माझे; जुळतील सप्तसूर.
- सप्तपदीच्या पावलांनी मनी; संस्कार असे केले, सात जन्मी _______ ; माझे सौभाग्य ठरले.
घास भरवितांना चे उखाणे
- मिठाने वाढते; स्वयंपाकाची लज्जत, _______ ना घास भरवते; सुरु करा पंगत.
- याच क्षणाची कधीपासून; लागली होती आस, _______ ना भरवते; _______ चा घास.
- द्रौपदीची थाळी; कधी रिक्त नसते, _______ ना घास भरविता; मुखी हसू उमलते.
- नांव घेते रुसू नका; थांबवू नका पंगत, _______ म्हणतात या घासाची; कशालाच नाही रंगत.
- पंचपक्वांनांनी; केळीचे पान सजले, _______ ना घास भरविताना; माझेच पोट भरले.
गृहप्रवेश चे उखाणे | Gruhapravesh Ukhane
- उंबरठ्यावरले भरले माप; हळूचकन लवंडले, _______ च्या संसारस्वप्नांनी; मन माझे मोहरले.
- माता-पित्याचे रुप; सासू-सासऱ्यात पाहीन, _______ च्या संसारात; सगळ्यांची माया मिळवीन.
- कुणी होतो लखपती; कुणी होतो करोडपती, _______ च्या रुपाने मला; लाभले मनपसंत पती.
- पंचज्योतीने माझे सासरी; औक्षण थाटात केले, _______ सारखा साथी लाभल्याने; जीवन सार्थकी झाले.
गृहप्रवेशा नंतर चे उखाणे
- हिरव्या काकणांची किणकिण; मनात रुणझुणते, _______ सौ. झाले; हे हळूच कानी सांगते.
- तीन पदरी मंगळसूत्र; तनुवर छान खुलले, पहाताक्षणी _______ ना; मनाने होते वरले.
- आजवर केली प्रतीक्षा; _______ तुमच्यासाठी, पहिल्याच भेटीत मनामनाच्या, जुळल्या रेशीमगाठी.
- मंगळसूत्राच्या वाट्यांचा स्पर्श; तनूला खूप सुखावतो, भर दिवसा वेडा जीव; _______ चेच स्वप्न पाहतो.
- नवी वस्त्रे सुवर्णालंकार; शृंगाराने देह सजला, केसात गजरा माळून; _______ नो कळस त्यावर चढविला.