रत्नांची माहिती
या भागात आपण निरनिराळी रत्ने आणि त्यांचे ज्योतिषशास्त्रीय गुणधर्म त्यांचे कारकत्व व त्याचे ग्रहाचे प्रतिनिधीत्व पाहू. सर्वसाधारण ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांच्या नऊ रत्नांना महत्वाचे मानले आहे. त्यांना महारत्ने म्हणतात. ती पुढील प्रमाणे आहेत.
- सूर्य किंवा रवीचे रत्न माणिक
- चंद्राचे रत्न मोती
- मंगळाचे रत्न पोवळे
- बुधाचे रत्न पांचू
- गुरूचे रत्न पुष्कराज
- शुक्राचे रत्न हिरा
- शनीचे रत्न नीलम
- राहूचे रत्न गोमेद
- केतुचे रत्न लसण्या
आणखी दोन ग्रहांची रत्ने सध्या वापरात आहेत ती म्हणजे हर्षल ग्रहाचे रत्न अलेक्झांड्रा व नेपच्युन ग्रहाचे रत्न ओपल. इतर आणखी बरीच रत्ने आहेत. म्हणजे वरील अकरा रत्ने धरून एकूण चौऱ्याऐंशी रत्ने आहेत. पण त्यातली सर्वच रत्ने ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या फळे देत नाहीत.
वरील नऊ रत्ने ही महारत्ने आहेत व बाकी सर्व उपरत्ने आहेत. त्यातील फक्त फळ देणाऱ्या पुढील रत्नाचाच आपण विचार करणार आहोत. ती पुढील प्रमाणे आहेत.
नऊ महारत्ने :
१) माणिक २) मोती ३) पोवळे ४) पांचू ५) पुष्कराज ६) हिरा ७) नीलम ८) गोमेद व ९) लसण्या
आणि पुढील उपरत्ने: १) अलेक्झांड्रा २) ओपल ३) गारनेट ४) मुनस्टोन ५) कार्नेलियन ६) हिरवा ओनेक्स ७) टोपाझ ८) स्फटीक ९) अक्वामरीन १०) टायगर आय ११) पेरीडॉट १२) तुर्मेलीन १६) टरक्वाईज १७) लापीझ लाझुली १८) जस्पर १९) स्टार रूबी २०) स्टार सफायर २१) डस्टोन २२) नीली २३) सफेद पोवळे २४) अगाटे २५) अंबर
१) माणिक – रुबी (Ruby) – सूर्य किंवा रवीचे रत्न
हे डाळींबी, गुलाबी, लाल रंगाचे सुर्याचे प्रमुख रत्न आहे. हे रत्न घालत्याने मुख्यत्वेकरून नाव आणि प्रसिद्धी जास्त मिळते म्हणून लोकांच्या जास्त संपर्कात येणाऱ्या लोकांनी हे जरूर वापरावे सत्ता, अधिकार, जागतीक यश. किर्ती, लौकीक, मानसन्मान, सरकार दरबारी ओळख, कामात तत्परता, चपकाई, धिटाई, आत्मविश्वास, सारासार विचार, शुध्द प्रेम, प्रामाणिकपणा, व्यापारात यश भरभराट, सरकारदरबारच्या वरदानाने उन्नती, पराक्रमाने संपत्ती प्राप्ती, मोठमोठ्या जलप्रवासातून लाभ, अधिकाऱ्यांकडून कृपादृष्टी, वगैरे फायदा होतो. अधिकारी, कलाकार, व्यापारी, न्यायाधीश राजकीय क्षेत्रातील वगैरे व्यक्तिमत्वाच्या लोकांनी जरूर वापरावे की जेणेकरून त्याच्या हांतून अधिकाराचे उल्लंघन होत नाही व घेतलेले सर्व निर्णय कामयाब होतात व लोकाकडून त्याची वाहवा होते. सूर्याचा जर चंद्राच्या किंवा लग्नाच्या सप्तम स्थानाशी संबंध येत असेल किंवा सुर्य शुक्र युति असेल तेव्हा ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय वापरू नये. कारण त्यांच्या विवाहात किंवा वैवाहीक सुखात कमतरता किंवा अगदीच जास्त सूर्याचा प्रभाव असेल तर घटस्फोट होण्यापर्यंत मजल जावू शकते.
२) मोती – पर्ल (Pearl) – चंद्राचे रत्न
हे एक शुभ्र रत्न आहे ह्यात पिवळी, नीळी, गुलाबी, लाल, हिरवी व सफेद छटा असते. हे चंद्राचे रत्न आहे. हे रत्न घातल्याने मुख्यत्वे करून मनःशांती व आनंद मिळतो. हाती घेतलेल्या कार्यात यश व भरभराट, मंत्रशास्त्र व ज्योतीषशास्त्र वगैरे गुढशास्त्रात प्रगती, कापडाच्या व्यापारात फायदा, सुंदर वस्त्रे परिधआन करण्यस मिळणे म्हणजेच मंगलकार्यात सहभागी होणे, खोबऱ्याचे व इतर तेल व्यापारात फायदा, स्त्रीवर्गाशी जास्त आपुलकी, स्त्रीवर्गाकडून फायदा, सार्वजनिक कार्य, जलप्रवास, समुद्र किंवा नदी, तलावाकाठी वास्तव्य, चांगली स्वप्रे पडणे, सर्वसाधारण राहत्या जागेत बदल, वाहनसौख्य, फळभाज्या बी बीयाणे, अन्नधान्य यांचे व्यापार, सिनेमा, सायन-वादन-नृत्य यांत प्रावीण्य, मच्छीमार व्यापार. हे एक असे रत्न आहे की ते कोणीही वापरू शकते सर्वसाधारण ज्या लोकांना डोक्यानी म्हणजे विचारपूर्वक कामे करावी लागतात, डोक्याला नेहमी ताण पडेल अशी कामे करावी लागतात त्यांनी हे रत्न वापरावे. मानसिक चिंता ज्याना जास्त आहे त्याने सुध्दा हे रत्न वापरल्यास त्यांना फायदा होतो. हे रत्न मुख्यत्वेकरून रवि, शनी, राहू व केतू बरोबर वापरू नये असे माझे अनुभव सांगतात फक्त जेव्हां चंद्र रवि, चंद्र शनी वाचयोग दर्शवतात तेव्हा वापरायला हरकत नसावी, पण ते ज्योतिषाच्या सल्लयानेच करावे.
३) पोवळे – कोरल (Coral) – मंगळाचे रत्न
हे एक शेंदरी, लाल, भगवे रत्न आहे. हे मंगळ ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न घातल्याने अंगात नवचैतन्य, नवाजोम, हुरूप वाढतो, अचानक धनप्राप्ति, जमिन जुमल्यात फायदा, जनावरांच्या व्यापारात फायदा, महत्वाकांक्षा, शूरपणा, शत्रुवर विजय, पुढारीपण, व्याख्यानबाजी, यंत्रकाम, ऑपरेशन वगैरेत यश मिळते, निरनिराळ्या मैदानी खेळात प्राविण्य मिळते, खरेदी-विक्री, यंत्रसामुग्री, सदाबाजार, विज, जमिन वगैरे व्यवहारात फायदा होतो. हे रत्न वापरल्याने अंगातील घाबरटपणा जाऊन माणूस धीट आणि उत्साही बनतो म्हणून हे रत्न ज्याचा मशीनशी संबंध आहे असे लोक, इंजीनीयर, खेळाडू, डॉक्टर ऑपरेशन करणारे सर्जन, सैनिक, सैन्यातील अधिकारी, पोलीस, पोलीस अधिकारी, वगैरे लोकानी वापरावे. सहा, सात, आठ व बारावा भाव यांच्याशी मंगळाचा संबंध असेल तर ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय हे वापरू नये ह्या रत्नाबरोबर मोती किंवा पुष्कराजचे परिणाम जास्त चांगले दिसून येतात.
४) पांचू – इमराल्ड (Emerald) बुधाचे रत्न
हे हिरव्या गर्द रंगाचे किंवा दूर्वांच्या हिरव्या रंगाचे आकर्षक रत्न आहे. हे बुध ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न घातल्याने मुखत्वे करून माणसात वैचारिक फरक होतो प्रत्येक गोष्ट तो विचारपूर्वक करतो. बौद्धिक प्रगती होते, विद्यार्थीवर्गाला हे रत्न फारच उपयुक्त आहे. सर्वसाधारण विद्यार्थीवर्गाने हे रत्न किंवा चंद्राचे मोती वापरावे अगदीच मोठी किंवा महत्वाची परीक्षा असेल तेव्हा पुष्कराज़ वापरण्यास हरकत नाही. हे रत्न महत्वाच्या कामावरील नेमणूक होणे, परराष्ट्रीय वकालत व तत्सम कामे, सराफाचा धंदा, ज्योतिष, कारकून, शाळा मास्तर, रजिस्टार, लेखक, वक्तृत्वात नैपुण्य विविधकलात प्रगति, भाषा- वाङमय यातील नैपुण्य, व्यापार धंद्यातील हिशोबीपणा, विविध शास्त्रे, शिक्षण, बागबगीचा, कमीशन, टिकाशास्त्र, ग्रंथ प्रकाशन, वर्तमान पत्रे, मासिके, पत्रव्यवहार, सेक्रेटरी, वायद्याचे व्यापार, व्यवस्थापन, टायपिस्ट, गणितशास्त्र, मुद्रक, वकीली, बॅरेस्टरी, मानसशास्त्र नृत्य, कविता इत्यादी कार्यांत प्रगती देतात. सर्वसाधारण ज्या लोकांचा लेखन, विचार, बुध्दी, निर्णय घेण, हिशेब, गणित यांच्याशी जास्त संबंध आहे त्यांनी म्हणजे, विद्यार्थी, शिक्षक, रजिस्ट्रार, अकाऊंटंट, वकील, बॅरिस्टर, लेखक, प्रकाशक, मुद्रक, व्यापारी, कमिशन ओजन्ट वगैरे लोकानी वापरायला हरकत नाही.
५) पुष्कराज – यलो सफायर (Yellow Sapphire) – गुरूचे रत्न
हे एक पिवळ्या रंगाचे पाणीदार रत्न आहे. ह्या रत्नांत इतर रत्नापेक्षा साधेपणा म्हणजे कमीचमक व शांतपणा असतो. हे गुरू ग्रहाचे रत्न आहे. खर तर हे रत्न सगळ्यांनीच वापरावे इतके प्रभावी आहे. गुरू जसा आपल्यामागे सतत उभा असतो. आपल्या सुखदुःखांत आपल्याला मार्गदर्शन व मदत करतो, तसेच परिणाम ह्या रत्नाचे आहेत. हे आपल्याला पैशाच्या ढिगाऱ्यावर बसविणार नाही की खाली कोसळविणार नाही. पण जेव्हा कधीही आपण अडचणीत असाल तेव्हा त्यातून अचानक मार्ग निघेल. अगदी आपल्या अनपेक्षित आपल्याला कधी थोड्याफार पैशांची अडचण असेल तर ते सुध्दा कोठूनतरी उभे राहातात. थोडक्यात हे रत्न आपल्या आयुष्यात आपल्याला फार मदत करते. आपले चाललेले सर्व व्यवहार, कामे सुरळीत चालू राहातात व त्यात हळू हळू वाढ होते. अचानक आपल्या मनातल्या काही गोष्टी घडून येतात, व हळूहळू आपल्या सर्व साधारण फलद्रुप होणाऱ्या इच्छा हे पूर्ण करते. माणसाच्या मनातील वाईट विचार कमी करून त्याला देवावर श्रध्दा करायला लावते. सर्व रत्नामध्ये ह्या रत्नात फळ देण्याची कार्यक्षमता अधिक आहे असे दिसून येते. अगदीच हजारांत एखाद्याला ह्या रत्नाच्या फळाचा अनुभव येत नाही. जनतेकडून मानसन्मान, उत्साह, बौद्धिक वाढ, आरोग्य संपदा, मंत्रशास्त्र व ज्योतिषशास्त्र वगैरे सारख्या गुढशास्त्रातील अभ्यासात प्रगल्भता, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, प्रार्थना, पूजा घरातील मंगलकामी धनसंपत्तीचा लाभ, वाहनसौख्य, राजकारणी/अधिकारी लोकांकडून मदत, मुलांची भरभराट, दुसऱ्यावरील प्रभुत्वात वाढ, मोठमोठ्या संधी उपलब्ध होणे, धार्मिक पुस्तकाबद्दल आवड, पतिसौख्य, ग्रंथकर्तृत्व, कीर्ती, तीर्थयात्रा. माझ्या मते हे रत्न कोणीही वापरावे, फक्त ह्या रत्नाबरोबर दुसरे रत्न वापरायचे असल्यास ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. मोती, पोवळे, माणिक ह्या बरोबर वापरता येते. दुसऱ्या इतर रत्नाबरोबर हे वापरल्यास ह्याचा प्रभाव कमी होतो किंवा कधी कधी प्रभावहीन होते.
६) हिरा – डायमंड – (Diamond) शुक्राचे रत्न
हे सर्व रत्नांमधील चमकदार व महाग रत्न आहे. इतर रत्ने अपण कॅरेटच्या (वजन) हिशोबात वापरतो पण हे रत्न सेंटच्या हिशोबात वापरावे लागते. कमीत कमी ३ ते ५ सेंटवजन असावे हे एक शुभ्र रत्न आहे पण ह्यात सुध्दा कमी अधिक रंगाच्या छटा असतात. लाल, हिरवा, निळा, पिवळा, हे रत्न वापरल्याने मनुष्याच्या वागण्यात अतिशयोक्ती येते. सर्व गोष्टी अति करण्या कडे किंवा सौदर्यवान असण्याकडे ह्याचा कल रहातो. मेहनत न करता पैसा हाती येतो. पण सर्वात महत्वाचे म्हणजे माणसाच्या अंगातील उपजत कला कसब हा वृद्धिंगत करतो, स्त्रियांनी वापरल्यास त्यांचे सौदर्य वृद्धिंगत करतो, कलाकारांनी वापरल्यास त्यांची कला वृद्धिंगत होते. कुंडलीत चंद्र बिघडला नसल्यास हा एकटाच वापरल्यास काही हरकत नाही पण चंद्र बिघडला असल्यास बुधाच्या रत्नाबरोबर म्हणजे पांचूबरोबर वापरावे म्हणजे आपल्या मनावर ताबा रहातो. हे रत्न वापरल्याने अति उत्साह, कामवासना, तृप्ति, सौदर्याचे आकर्षण संगीताची गोडी. सर्व कलेत पारंगतपणा, भोठमोठ्या उलाढाल्या असलेल्या व्यापारात फायदा, अचानक मिळणारे गुप्तधन, पत्निसौख्य/ पतिसौख्य, आनंदी कुटुंब, मित्रमंडळी, चैन व एषआरामाकडे ओढा, शर्यती, जुगार, मद्य ह्याकडे ओढा, छानछोकी कपडे व वस्तू वापरण्याकडे कल, स्वतंत्र धंदा, कापूस, कपडा, उंची सौदर्य प्रसाधने, हिरे, सोने, अलंकारह्यांचा व्यापार, हॉटेल, वहातूक, तयार कपड्यांचा व्यापार वगैरे लाभ होतात. सर्वसाधारण हे रत्न ज्यांचा वर सांगितलेला धंदा आहे किंवा ज्यांचे स्वतंत्र धंदे आहेत आणि त्यात लाखो रुपयांची आवक जावक आहे त्यांनी वापरावे, कलाकार, संगीतकार, गायक, कलाकौशल्याशी ज्यांचा संबंध आहे. वकील (यांना सुंदर व मुद्देसुद बोलावे लागते व ती सुध्दा एक कला आहे) लोकांनासुध्दा ह्या रत्नाचा फायदा होवू शकतो पण त्यांनी ह्या रत्नाबरोबर पांचू रत्न वापरावे. पण शेवटी हे रत्न कोणीही वापरताना ज्योतिषाच्या सल्ल्यानेच वापरावे हे उत्तम.
७) नीलम – ब्लू सफायर (Blue Sapphire) – शनीचे रत्न
हे एक निळ्या रंगाचे अति थंड रत्न आहे. हे शनी ग्रहाचे रत्न आहे. हे रत्न वापरल्याने माणसाच्या अंगात शांतपणा, गंभीरपणा, व्यवहारीपणा, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्याची शक्ती, कोणत्याही गोष्टीला लागणारा वेळ येईपर्यंत थांबण्याची सहनशक्ती, परीपक्वता येते. हे रत्न वापरण्यामुळे कितीही काबाडकष्ट करून आपले ध्येय साध्य करतो. वृध्दजनांशी चांगले संबंध ठेवतो, माणूस पुढारीपणा, गुढ तत्वज्ञान, थंडपणा, संस्थांशी संबंध येणे, कामातील व्यग्रता, समजुतदारपणा, स्थितप्रज्ञता, कोर्ट कचेरीच्या कामात सफलता, लोखंड व शेतीभातीचा व्यवसाय, खाणी, खनीजपदार्थ, छापखाना, कायदा (वकीली), नोकरचाकरांचे सुख, एकांतवासात राहण्याची इच्छा, फाजील आत्मविश्वास, कवडीचुंबकपणा, आळशीपणा, एकाच कार्यात सतत गुंतून रहाणे, कोणत्याही शास्त्राचा सखोल अभ्यास, शास्त्रीय संशोधन, धर्मभिमान जपताप, कायद्याची कडक अंमलबजावणी, काटकसर, व्यापार व कृति यांत सुत्रबध्दता, तत्वज्ञान, हे रत्न माझ्यामते लहानमुले, तरुणविद्यार्थीवर्ग यानी सहसा वापरू नये. साधारण २५ वर्षावरील व्याक्तीनी की जे स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करतात व जेथे त्यांना शिस्तबध्द काम करावे लागते किंवा अंगमेहनतीचे काम करावे लागते. व्यापारात हे रत्न चटकन फायदा देते. वकील लोकांना सुध्दा हे वापरायला हरकत नाही. परतू एक निश्चित की हे रत्न वापरण्यापूर्वी चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. स्वतःच्या मनाने हे रत्न वापरू नये.
८) गोमेद – झीरकॉन (Hessonite) – राहूचे रत्न
हे एक गोमुत्री रंगाचे किंवा मधाच्या रंगाचे सुंदर सुंदर रत्न आहे. हे राहू ग्रहाचे रत्न आहे. सर्वसाधारण हे रत्न आर्थिक आणि प्रापंचिक अडचणीमध्ये वापरतात. अचानक सगळ्या चांगल्या चाललेल्या गोष्टी थांबतात, सगळे उलट व्हायला लागते. आजपर्यंत सर्व गोष्टी ठरविल्या प्रमाणे पार पडत होत्या, पण आता अचानक सर्व उलट व्हयला लागले, इतके दिवस हातात पैसा खेळत होता तो अचानक बंद झाला, अडकून पडू लागला, ह्या सर्व गोष्टी घडू लागल्या की समजावे राहूचा आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी संबंध येऊ लागलाय. एखादेवेळेस गोचर राहू वाईट असेल किंवा राहूची महादशा किंवा आंतरदशा चालू झाली असेल, सर्व गोष्टी अचानक घडू लागतात तेव्हाच आपण समजावे. ह्यावेळी हे रत्न फार उपयोगी पडते. घरात सर्व गोष्टी चांगल्या घडत असताना सर्व गोष्टी विस्कळीत होतात, आईवडीलांशी पटत नाही. भावंडाशी उगाचच धुसफुस व्हायला लागते, मुलांशी पटत नाही, नातेवाईकांबरोबर भांडणे होतात, इतके दिवस चांगले वागणारे शेजारी अचानक शत्रूसारखे वागायला लागतात. तेव्हा हे रत्न चमत्कार घडवू शकते. घराला कोणाची तरी नजर लागल्यासारखे वाटते, घरातली माणसे ह्या नात्या प्रकारे आजारी पडू लागतात तेव्हांसुध्दा हे रत्न वापरावे लागते. सर्वसाधारण हे रत्न राजकारणी, व्यवसायी, मग तो कोठलाही व्यवसाय असू दे, ज्यांना धाडसी कामे करावी लागतात, धंद्यात मोठमोठ्या रकमाचे व्यवहार करावे लागतात, सतत पैश्याच्या देवाण घेवाणीशी संबंध आहे, सट्टा, लॉटरी, रेस, जुगार ह्याशी संबंधीत पैशाचा रोज संबंध असेल तर त्यानी हे रत्न वापरावे. कधी कधी हे रत्न राहूच्या राशीत असेत त्या राशीच्या ग्रहासंबंधाने सुध्दा त्याच्या कारकत्वात कमी असल्यास वापरता येते. राहू २, ३, ६, १०, ११ स्थानात असल्यास त्याच्य दशेत हे रत्न वापरल्यास फायदा करून देते. हे रत्न वापरल्यास वजन अंकशास्त्राप्रमाणे काढून वापरले असता किंवा ज्या ग्रहाच्या राशीत राहू आहे त्या ग्रहाच्या अंकाप्रमाणे वजन (स्ती किंवा कॅरेट) वापरावे.
९) लसण्या कैट्स आई (Cat’s Eye) – केतुचे रत्न
हे एक काळसर, पीवळसर, छटा असलेले व मधोमध एक रेषा असलेले, मांजराच्या डोळ्याचा भास देणारे रत्न आहे. ह्या रत्नाचा सर्वसाधारण उपयोग राहूच्या-गोमेद रत्नासारखाच आहे. फक्त ह्यात सर्व चांगल्या घडणाऱ्या गोष्टी थांबतात, चांगली चाललेली कामे ठप्प होतात, चांगले चाललेले धंदे बंद होतात. आपल्याला सर्व व्यवहार आवरते घ्यावे लागतात. राहू व्यवहार बंद करत नाही पण अव्यवस्तित, असुरक्षत करतो. हा कोणत्याही विशिष्ट धंद्यासंबंधी वापरला पाहीजे वगैरे नाही, पण बंद पडलेले धंदे न येणारा पैसा, न होणारी कामे हा करू शकतो. अचानक मिळणारी संपत्ती, गुप्तधन, अडकलेले वारसाहक्क, अडकलेले कोर्टकचेरीचे निकाल ह्या सर्व गोष्टी तो सुरळीत पार पाडतो. शेयरमार्केटमध्ये काम करणाऱ्यांनी, ज्यांना पैश्याचे कमी अधिक फायदे होतात, बंद पडलेला फॅक्टऱ्या, बंद पडलेले कारखाने, बंद पडलेले धंदे हा चालू करतो. राहू व केतूमध्ये आणखीन एक वैशिष्ट आहे. राहू व केतूची रत्ने जवळ बाळगली तरी चालतात त्यांच्या अंगठ्या लॉकेट नाही बनवले तरी चालतात. पण ते पैश्याच्या पाकीटात किंवा खिशात किंवा गल्ल्यात ठेवावे लागतात.
१०) अलेक्झांड्रा हर्षल
हे एक रंग बदलणारे हिरवट जांभळे, निळसर जांभळे किंवा लालसर जांभळे रत्न आहे. तसे पाहिलेअसता हे एक महारत्न आहे . व शुध्द रत्न सांपडले तर ते हिऱ्यापेक्षाही किंमती आहे. हे रत्न हर्षल ग्रहासाठी वापरतात. तसे हे एक शांत रत्न आहे पण ह्याला नेहमी बदल हवा असतो एकाच नोकरीत काम करणाऱ्यांना हे फारसे फायदेशीर होत नाही, नेहमी नवी नवी हिंमतीची कामे करणारे नवीन संशोधन करणारे, नेहमी कामात बदल असणारे ह्या लोकांना हे रत्न वापरणे फायदेशीर आहे, कॉम्प्युटर, टेलीव्हीजन, इलेक्ट्रॉनीक, ओव्हीओशन वगैरे अतिहुशारी लागणारे काम करणाऱ्यांनी हे रत्न वापरावे. थोडक्यात संशोधन व नवीन काहीतरी करणारे चाकोरीबाहेर जाऊन काही काम करणारे मग ते कोठल्याही क्षेत्रात असू देत, त्यांनी हे रत्न जरूर वापरावे. अतिहुशार पण एकाग्रता नसलेल्या विद्यार्थ्यांनी इंजीनीयरींग डॉक्टर वगैरे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हे वापरून पाहायला हरकत नाही. हे ओक शुभरत्न आहे.
११) ओपल – नेपच्यून
हे एक पांढरे दुधाळ रत्न आहे. उजेडात धरल्यास ह्यात निरनिराळे रंगाचे बिंदू दिसतात. हे रत्न म्हणजे अंक शांत कलाकार आहे. कोठल्याही क्षेत्रात जेथे कलेला वाव आहे तेथे हे रत्न उपयोगी पडते, हे वापरल्याने माणसातल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, त्यातले बारकावे, खुब्या हे रत्न वापरल्याने जास्त उठून दिसतात. ह्यात हिऱ्यांची धुंदी, व्यसन महती नाही, पण सागराचा शांतपणा आहे. कलाकार, संगीतकार, वादक, इंटीरिअर. आर्किटेक्ट इंजीनियर, डॉक्टर, सर्जन, वक्ते, लेखक कवी, वगैरे लोकांना हा वापरायला काहीच हरकत नाही.