चेहरा सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण च करत असतो. अनेक जणांना चेहऱ्यावरील तेलकटपणा कसा घालवावा याची चिंता असते.
या लेखात आपण यावरील काही घरगुती उपायावर चर्चा करणार आहोत:
तेलकट चेहरा साठी उपाय: Oily face tips
- एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा मध व अर्धा चमचा साय काढलेले दूध एकत्र करून आंघोळीपूर्वी लावावे.
पंधरा मिनिटे ठेवावे. टोमॅटोचे दोन भाग करून चेहऱ्याला चोळावे. पूर्ण सुकू द्यावे. चेहरा धुवावा.
याने त्वचा टवटवीत व उजळ होते. तसेच त्वचेवरील छिद्रे आवळली जातात. - बटाटा न सोलता त्याचे दोन भाग करावे. थोडा वेळ थंडगार पाण्यात बुडवावे व चेहऱ्यावर, मानेवर, हातांवर हलके हलके घासावे.
रंग उजळतो. - एक चमचा तुळशीचा रस व अर्धा चमचा मध हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपताना घ्यावे.
यामुळे रक्त शुद्ध होऊन कांती निरोगी, चमकदार दिसू लागते. - दोन-तीन बदाम रात्री पाण्यात भिजत टाकावे. सकाळी वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. त्वचेचा रंग उजळून निघतो.
- २ चमचे मध, २ चमचे लिंबाचा रस, १ चमचा पिठीसाखर एकत्र करून चेहऱ्यावर लावावे. हे एक उत्तम ब्लिचिंग क्रीम आहे.
- रात्री मसुरीची डाळ दुधात भिजवावी. सकाळी वाटून चेहऱ्याला लावावी. कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. नियमित वापराने चेहरा उजळतो.
- दोन-तीन कच्चे बटाटे मिक्सरमध्ये वाटून मऊ पेस्ट तयार करावी. ती चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा.
चेहरा नैसर्गिकरीत्या ब्लीच होतो. - उन्हाने त्वचा काळी झाली असल्यास थोड्या दुधात लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर, हातावर चोळावे. सुकल्यावर धुऊन टाकावे.
- त्वचा निस्तेज दिसत असल्यास एक चमचा गुलाबपाण्यात काही थेंब लिंबाचा रस व एक चमचा काकडीचा रस एकत्र करून लावावे.
- एक चमचा काकडीच्या रसात काही थेंब लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद टाकून चांगले एकत्र करावे.
चेहऱ्यावर, मानेवर आणि हाताच्या काळवंडलेल्या भागावर लावून अर्ध्या तासाने धुऊन टाकावे. त्वचेचा रंग उजळतो. - दोन-तीन बदाम रात्री पाण्यात भिजत घालावे. सकाळी बदाम सोलून बारीक वाटावे. त्यात एक चमचा बेसन,
एक चमचा कच्चे (न तापवलेले) दूध आणि चार-पाच थेंब लिंबाचा रस मिसळावा.
ही पेस्ट चेहऱ्यावर व मानेवर लावून पंधरा ते वीस मिनिटे ठेवावे.नंतर हळूहळू चोळून काढून टाकावे.
चेहरा कोमट पाण्याने धुऊन त्यावर गार पाण्याचे हबके मारावे. आठवड्यातून दोनदा तरी हा पॅक लावावा. चेहरा टवटवीत व उजळ होतो. - चवळीच्या शेंगांचा रस काढून त्यात कच्च्या हळदीचा रस किंवा थोडी हळद एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास चेहरा स्वच्छ उजळ दिसतो.
- चवळीचा रस, दूध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याच्या कांतीत लक्षणीय फरक पडतो.
- भिजवलेले बदाम वाटावे. त्यात दुधाची साय, काही थेंब लिंबाचा रस व ग्लिसरीन मिसळून लावावे. रंग उजळतो.
- दोन मोठे चमचे ओटमिल (जवाचे पीठ) आणि चमचाभर लिंबाचा रस एकत्र करून पाण्यात कालवावे.
ही पेस्ट चेहऱ्याला व हातांना लावावी. सुकल्यावर धुऊन टाकावे. मॉईश्चरायझर लावावे. कारण या पॅकमुळे त्वचा कोरडी होते. - लिंबाचा रस, थोडेसे दूध व बार्लीचे पीठ यांचे मिश्रण सर्वांगावर चोळून लावावे. दहा-पंधरा मिनिटांनी आंघोळ करावी.
यामुळे त्वचा उजळून येते. दहा-पंधरा
घरगुती फेस पॅक Home made face pack
- एक चमचा दुधात (कोरडी त्वचा असल्यास दुधाच्या सायीत) एक चमचा हळद, चंदनाची पावडर व बेसन मिसळावे.
चांगले एकत्र करून आंघोळीपूर्वी अर्धा तास हा पॅक लावून ठेवावा. आंघोळीच्या वेळी थोडे ओले करून हळूहळू चोळून काढावा.
नियमितपणे केल्यास किरकोळ डाग वगैरे जाऊन चेहरा टवटवीत दिसतो. - एक कप पाण्यात एक चमचा बडीशेप उकळावी. झाकण ठेवून गार होऊ द्या यातील एक चमचा पाण्यात एक चमचा मध व दोन चमचे दही मिसळावे,
चेहयाला लावून पूर्ण सुकू द्यावे. कोमट पाण्याने धुऊन नंतर गार पाण्याचे हबके मारावे. या पॅकमुळे चेहरा स्वच्छ होतो.
बडीशेपचे उरलेले पाणी फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. दिवसातून दोनदा क्लिन्सरसारखे वापरावे.