दैनंदिन वापरत मराठी भाषेत बऱ्याच म्हणी वापरल्या जातात. त्यापैकी १३० म्हणी खालीलप्रमाणे
गमतीदार मराठी म्हणी: Funny Marathi Mhani
- जाळावाचून कड नाहीं; मायेवाचून रड नाहीं.
- ज्याचें जळें त्याला कळे.
- मऊ लागलें म्हणून कोपरानें खणूं नये.
- सदीचा चोर त्याच्या कमरेस दोर.
- आलें देवाजीच्या मना, तेथें कोणाचें चालेना.
- असतील बाळ तर फेडतील काळ.
- नकटे व्हावें पण धाकटे होऊं नये.
- आंधळ्याच्या गाई देव राखी.
- सासरा पाहुणा आला, म्हणून रेडा थोडाच दुभवता येणार आहे ?
- धन्या धत्तुरा, अन् चोरा मलिदा.
- जोवरी पैसा तोवरी बैसा.
- असेल हरी, तर देईल खाटल्यावरी.
- बुडत्याचा पाय खोलात.
- पदरी पडले, पवित्र झालें.
- ज्याच्या अंगी पाप, त्याला पोरे होती आपोआप.
- गोठणीवरच्या गाई श्यामभट दान देई.
- गोड करून खावं अन् मऊ करून निजावं.
- उंदराचा जीव जातो आणि मांजराचा खेळ होतो.
- गांवड्या गावांत गाढवी सवाशीण.
- जाती तशी. पुती आणि खाण तशी माती.
- आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारटा.
- कुठे इंद्राचा ऐरावत अन् कुठें शामभट्टाची तट्टाणी.
- आगीतून फोफाट्यांत पडणें.
- चोर सोडून संन्याशाला सुळी देणें.
- साखरेचें खाणार त्याला देव देणार.
- कुत्र्याचें शेपूट नळीत घातलें तरी वाकडे ते वाकडेंच.
- दिव्याखाली अंधार.
- बाळाचे पाय पाळण्यांत दिसतात.
- देश तसा वेश.
- धर्म करतां कर्म उभे राहतें.
- शेळी जाते जिवानिशी खाणार म्हणतो वातड लागते.
- पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.
- पिंडी ते ब्रह्मांडी.
- भुकेस कोंडा निजेस धोंडा.
- गळ्यांत माळा पोटांत काळा.
- चाळीशी लोटली आशा खुंटली.
- चोराला डसला विंचू तो करीना हूं का चूं.
- बडा झाला कामांतून गेला.
- तोंड वांकडे दैव फाकडे.
- मुंगीस मुताचा पूर.
- आपले खावें पण दुसऱ्यास द्यावें.
- खैरांचे झाड म्हाताऱ्याचे हाड.
- देणावळ तशीं धुणावळ.
- जळते घर, भाड्यानें कोण घेतो ?
- घासून घ्यावें पण हंसून घेऊ नये.
- देणें अन् दुखणें कोणाला सुटत नाहीं.
- माय मरो पण मावशी जगो.
- उद्योगाचे घरी ऋद्धिसिद्धि पाणी भरी.
- आशा सुटेना अन् देव भेटेना.
- तीन पूरभय्ये आणि तेरा चुली.
- खायला काळ अन् भूमीला भार.
- कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
- फिरेल ते चरेल.
- आपले हात जगन्नाथ.
- नावडतीचें मीठ अळणी.
- कर्ज फार त्याला खाज नाहीं. उवा फार त्याला लाज नाहीं.
- चोरीचा मामला हळूहळू बोंबला.
- कान द्यावा पण कोन देऊं नयें.
- मेल्या म्हशीला पाच शेर दूध.
- बरी नव्हे थट्टा, भल्याभल्यास लावील बट्टा.
- लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून.
- धर्म करतां कर्म उभें रहातें.
- पिकल्याशिवाय विकत नाही.
- चमत्कार दाखविल्याखेरीज कोणी नमस्कार करीत नाहीं.
- विचंवाचे बिहाड पाठीवर
- रोज मरे त्याला कोण रडे
- कसायला गाय धार्जिणी
- हात दाखवून अवलक्षण करून घेणें
- नाकानें कांदे सोलणे
- बोलेल तो करील काय अन् गर्जेल तो पडेल काय ?
- ओढून ताणून चंद्रबळ आणणे
- विधवेने कुंकवाची उठाठेव कशाला करावी ?
- नाकापेक्षां मोती जड
- सोनारानेंच कान टोचावे लागतात
- खारट खोबरें खट्याळ गिन्हाईक
- दाम करी काम, बीबी करी सलाम
- घर फिरले म्हणजे वासेहि फिरतात
- काखेंत कळसा गांवाला वळसा
- सटवाईला नाहीं नवरा अन् म्हसोबाला नाहीं बायको
- वेळेवर वेळ शिमग्यावर खेळ
- छडी वाजे छमछम; विद्या येई घम घम
- येरे दिवसा भर रे पोटा
- शिमगा गेला तरी कवित्व शिल्लक रहातेच
- बुद्धि तशी फळें
- अन्न मारी अन्न तारी; अन्नासारखा नाहीं वैरी
- हपापाचा माल गपापा
- आप भला तो जग भला
- काल मेला व आज पितर झाला
- अडाणी कुणबी दुप्पट राबे
- अति रागा भाक मागा, त्याहून रागा देश त्यागा
- पायाची वहाण पायीं बरी
- मियां मूठभर अन् दाढी हातभर
- आई जेवूं घालीना अन् बाप भीक मागूं देईना
- जग हें अळवावरचें पाणी
- खायचे दांत निराळे अन् दाखवायचे दांत निराळे
- शेण जमिनीवर पडलें तर माती घेऊनच उठते
- पुष्पासंगे मांतीस वास लागे
- भोळा भाव सिध्दीस जाव
- घरोघरी त्याच परी
- मान सांगावा जगांत अन् अपमान ठेवावा मनात
- शिंक्याचें तुटलें की बोक्याचे साधते
- एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरु मारु नये
- कांही दिवस सासूचे, तर कांही दिवस सुनेचे
- जाणाऱ्याचे जाते अन् कोठवळ्याचे दुखते!
- असतील शितें तर जमतील भुतें!
- जसे करावें तसें भरावें !
- शहाण्याला शब्दाचा मार
- कामापुरता मामा अन् ताकापुरती आजीबाई
- उपट मूळ अन् घे खांद्यावर
- आपल्या पायाखाली काय जळतें ते आधीं पहावें
- खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
- ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊं नये
- नांव मोठे अन् लक्षण खोटे
- जातीसाठी खावी माती
- भरली मूठ सव्वा लाखाची
- सुक्याबरोबर ओलेही जळते
- हत्तीचे दात दाखवायचे निराळे, खायचे निराळे
- भुकेला कोंडा, झोपेला धोंडा
- मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?
- भिंतीलाही कान असतात
- परदुःख शीतळ असते
- दूरून डोंगर साजरे
- ताडाच्या झाडाखाली बसून दूध प्याले तरी लोक ताडीच समजतात
- तेरड्याचा रंग तीन दिवस
- तुझे माझे जमेना, तुझ्याशिवाय गमेना
- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाहीं
- जैसे करावे, तसे भरावे
- गाजराची पुँगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली
- गाढवाला गुळाची चव काय ?
- कावळ्याच्या शापने गाय मरत नाही