गुरु पौर्णिमा (आषाढ शुद्ध पौर्णिमा)
गुरु पौर्णिमा या पौर्णिमेला आषाढ शुद्ध पौर्णिमा, वेद व्यास जयंती आणि व्यास पौर्णिमा असेही म्हटले आहे. जाणून घेऊ या वर्षी कधी आहे गुरुपौर्णिमा.
गुरु पौर्णिमा तिथी
|
तारीख: |
03 जुलै 2023 |
वार: |
सोमवार |
तिथीची सुरवात: |
02 जुलै 2023 रोजी रात्री 08:21 पासुन. |
तिथीची समाप्ती: |
03 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 05:08 पर्यंत. |
गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते?
या दिवशी महर्षी व्यासांना प्रथम वंदन करण्याचा प्रथा आहे. महर्षी व्यास हे जगाचे आद्यगुरू होते. या दिवशी जगद्गुरू व्यासांची पूजा करतात. थोर गुरुजनांना आदराने वंदन करतात. गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. गुरु आपणास नवी दृष्टी देतात. योग्य पद्धतीने जाणतेपणाने कष्ट करण्यास शिकवितात, एकाग्रता, सहनशीलता, त्याग, आज्ञाधारकता वगैरे सद्गुण सद्गुरूंमुळेच आपणास प्राप्त होतात. अशा गुरुविषयी निष्ठा ठेवून आदर व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा विशेष दिन आहे म्हणूनच व्यास पौर्णिमा ही ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून मानतात. आपल्या गुरुबद्दलची निष्ठा सतत जागरूक ठेवण्याचा, गुरूंचे स्मरण करण्याचा आणि आपले जीवन सुधारण्याचा हा मंगल दिन आहे. या दिवशी रुद्राभिषेक करावा. गुरुला वस्त्र व दक्षिणा द्यावी. तसे न जमल्यास उपरणे, फेटा काहीतरी द्यावे. याच दिवशी संन्याशांच्या चातुर्मासाची सुरुवात होते.
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पूजेचा दिवस. व्यासपूजेच्या पवित्र दिवशी संस्कृति घडवणारांचे पूजन होते. संस्कृती घडविण्याचे काम वेगवेगळ्या रीतींनी अनेक ऋषींनी केलेले आहे. पण वेदव्यासानी सर्व विचारांचे संकलन करून आपल्याला संस्कृतीचा ज्ञानकोष ‘महाभारत’ ग्रंथ दिला. ‘भारत: पञ्चमो वेदः’ त्यांच्या या ग्रंथाला पांचव्या वेदाची उपमा प्राप्त झाली आहे. महाभारताद्वारे त्यांनी सांस्कृतिक विचार दृष्टान्तासहित सरळ भाषेत समाजा- समोर ठेवले. ‘मुनिनामप्यहम् व्यासः ।’ असे म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांची बिरुदावली गाइलेली आहे. वेदव्यासांचे जीवन व कवन अमर बनविण्या- साठी त्यांच्या अनुयायी चिंतकानी, संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या सर्वांनी त्यांच्यासाठी ‘व्यास’ संबोधन निश्चित केले. सांस्कृतिक विचार ज्या ‘पीठा’- वरून सांगितले जातात त्या ‘पीठा’लाही आज ‘व्यासपीठ’ म्हटले जाते. ह्या व्यासपीठावर आरूढ होऊन जो निःस्वार्थ भावाने स्वतःची उपासना किंवा भक्ती समजून स्वकर्तव्यरूपात : संस्कृतीच्या प्रचाराने जीवनव्रत घेतो, त्याची पूजा या दिवशी करून कृतकृत्य व्हायचे.
गुरु पौर्णिमा चे महत्व
ज्ञान देणाऱ्या गुरूला देऊ शकू असा तिन्ही लोकात दृष्टान्तच नाही. द्यायची असेल तर लोखंडाचे सोने करणाऱ्या पूरिसाची उपमा देऊ शकतो,
परंतु ती देखील अपूर्ण आहे. परिस लोखंडाचे सोने बनवतो पण स्वतःसारखा परिस बनवित नाही. गुरु तर शिष्याला स्वतःचे गुरुत्व देतो आणि म्हणूनच, शिष्याला स्वतःच्या प्रतिमूर्ती रूपात तयार करणारा गुरू निरुपम आहे. गुरु शिष्याच्या जीवनाला योग्य मार्गदर्शन करतो. गुरुशिष्याचा जीव एकमेकात संपूर्णपणे एकरूप झालेला असेल तरच खरे मार्ग-दर्शन शक्य बनते. शिष्य स्वतःला अनुकूल असते तेवढीच गोष्ट स्वीकारतो प्रतिकूल गोष्ट स्वीकारू शकत नसेल तर गुरु मार्गदर्शक बनू शकत नाही.स्वतःचे नावडते देखील मानण्याची तयारी असेल त्यालाच हा मार्गदर्शकगुरु मिळण्याचा संभव आहे.
सामान्य रीत्या शिष्यविचारतो आणि नंतर गुरु उत्तर देतो. विचारल्याशिवाय कोणाला काही सांगू नये, अशी स्मृतीची आज्ञा आहे, परंतु काही वेळेस तर शिष्याबरोबरच्या घनिष्टव आत्मीय संबंधामुळे गुरु स्वतःच शिष्याला प्रश्न विचारून योग्यउत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्या द्वारे त्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे वळवतो.
शिष्याच्या अंधकारमयजीवनात गुरु प्रकाश-प्रदीप प्रगटवतो. अशा गुरूचा स्वतःच्या बुद्धीवर तसाच शिष्याच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास असतो आणि म्हणूनच तो दुराग्रही न बनता शिष्याला समजावून, त्याच्या बुद्धीत स्वतःचे विचार उतरवून त्याला सन्मार्गावर घेऊन जातो. याच्यासाठी लागणारे अपेक्षित धैर्य त्याच्याजवळ विपुलप्रमाणात असते. तो समजावताना थकत नाही किंवा कंटाळत नाही. अर्जुनाचा मोह नष्ट करण्यासाठी तसेच त्याच्या बुद्धीत ज्ञानप्रकाश पाडण्यासाठी गीतेचे अठरा अध्याय सांगायला भगवान श्रीकृष्ण कंटाळले नाहीत आणि एवढे सांगितल्यानंतरही अर्जुनाच्या विवेक बुद्धीवरील विश्वास ते अनाग्रही राखू शकले आहेत, अशा गुरूच्या सानिध्यात शिष्याची बुद्धिनिष्ठा फुटते. गुरु अतिशय कृपाळू असतो. गुरूशिवाय ज्ञानमिळत नाही याचा अर्थ असा की, गुरु आपल्याला आपला विकास व अधिकार पाहून ज्ञान देतो. योग्यतेशिवाय मिळालेली विद्या पचत नाही; ती फुटून निघते. न पचलेले अन्न जसे दुर्गंधी निर्माण करते तसे न पचलेले ज्ञानदेखील जीवनाला दुर्गंधी बनवते.
गुरूजवळ शिष्य आत्मीय भावाने विनासंकोच स्वतःचे दोष सांगतो. त्याची खात्री असते की, गुरूला दोष सांगून देखील मी त्याच्या नजरेतून उतरणार नाही. तसेच गुरु माझ्या दोषांचा गैरफायदाही उठवणार नाही. ज्याच्या केवळ सान्निध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो तो गुरु