काय आता सर्वानाच ५ लाख रु चा सरकारी विमा? – Mahatma Phule Jan Arogya

Ayushman Bharat Yojana
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana (MJPJAY) and Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana (AB-PMJAY) integration

महात्मा फुले जन आरोग्य योजना – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दोघांचे एकत्रीकरण

आता सर्वानाच ५ लाख रु विमा खर्च ठराव मंजूर
महाराष्ट्र राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना हि 2 जुलै 2013 पासून सुरु करण्यात आली आहे.
त्यानांतर केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि  23 सप्टेंबर, 2018 रोजी सुरु करण्यात आली.
नंतर शासनाच्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य  आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,
या दोघांना एकत्रित करून सुधारित जी योजना आहे ती 01.04.2020 पासून अमलात आणली गेली.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत एकत्रीकरण – Ayushman Bharat-Pradhan Mantri Jan Arogya Yojana Incorporation

या योजनात आता शासनाने नवीन GR आला असून त्यात काही नवीन निर्णय घेण्यात आले आहेत.
त्यानुसार या योजनेत काय काय बदल केले आहेत. हे आपण या लेखात जाणून घेऊयात.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बदल – Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Scheme

सध्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY) वर्षाला 5 लाखाचे आरोग्य संरक्षण देण्यात येत आहे.
आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योज़ने अंतर्गत हे आरोग्य संरक्षण वर्षाला 1.5 लाखाचे आहे.
आता आनंदाची बातमी म्हणजे शासनाच्या बदलानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योज़ने अंतर्गत हि वर्षाला 5 लाखाचे आरोग्य संरक्षण मिळणार आहे.
हि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे रेशनधारक, डोमेसाइल / अधिवास प्रमाणपत्र असणाऱ्या जनतेला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन योजनांच्या एकत्रीकरणामुळे होणारे फायदे आणि लाभ – Benefits after changes in scheme

महात्मा फुले योजनेसाठी पात्र कोण आहे? यासाठी कोणत्या अटी आहेत?

याआधी या आरोग्य योजने चा लाभ फक्त पिवळे आणि केशरी रेशनकार्ड धारकांनाच मिळत होत.
पण आता यापुढे सर्वच नागरिकांना ह्या आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.
हो म्हणजेच ज्या नागरिकांकडे पांढरे रेशनकार्ड आहे त्यांना, आणि ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड नाही आहे पण अधिवासी प्रमाणपत्र आहे.
अश्या लोकांना देखील या योजनेचा लाभ  मिळेल.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत आता आरोग्य संरक्षण वाढवून 5 लाख एवढे करण्यात आले आहे

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) या योजनेत आधी 1.5 लाखाचे संरक्षण मिळत होते.
आता भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य (PMJAY) योजनेत एकत्रीकरण केल्यावर हे आरोग्य संरक्षण वाढवून 5 लाख एवढे करण्यात आले आहे.

मूत्रपिंडाच्या च्या ऑपेरेशन च्या खर्चासाठी साठी आता रक्कम वाढवून 4.5 लाख करण्यात आली आहे.

आता किडनी च्या ऑपेरेशन च्या खर्चासाठी साठी 4.5 लाख खर्च देण्यात येईल.
आधी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत हा खर्च 2.5 लाख एवढा दिला जात होता.
मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत नवीन उपचाराचा समावेश

ह्या दोन्ही योजना एकत्रित केल्यामुळे या योजनेचे नागरिकांचा अधिक फायदा होणार आहे.
आता महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत 916 उपचार उपलब्ध आहेत. त्यामध्ये उपचारांची संख्या 360 ने वाढवून 1356 करण्यात आली आहे.
याचप्रमाणे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1209 उपचार उपलब्ध आहेत त्यात 147 उपचाराची वाढ करून,
त्यातही उपचाराची संख्या 1356 करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत काही मागणी नसलेले उपचार काढून काही नवीन उपचारांचा समावेश केला आहे.
आता दोन्ही योजनेत उपचार संख्या हि 1356 च आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत रस्त्यावरील अपघातांवर उपचाराची मर्यादा रक्कम किती आहे?

स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा या योजनेच्या तरतुदीमध्ये काही सुधारणा केली गेली आहे.
यात रस्त्यावरील अपघातांवर होणाऱ्या उपचाराची संख्या वाढवून 184 अशी करण्यात आली आहे. आधी हि संख्या 74 अशी होती.
तसेच या अपघातात होणाऱ्या उपचाराची मर्यादा रक्कम रु 30,000 वरून 1 लाख एवढी करण्यात आली आहे.
आणि ह्या योजनेचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत केलं गेला आहे.
या रस्ते अपघात विमा च्या लाभार्थीं मध्ये महाराष्ट्रातील नागरिक त्याचबरोबर महाराष्ट्रा बाहेरील आणि देशा बाहेरील व्यक्तींचा समावेश केला गेला आहे.

महात्मा फुले योजनेत गुडघा बदलणे हि शस्त्रक्रिया समाविष्ट आहे का?

आजकाल गुडघ्याची झीज होणे किंवा गुडघेदुखी या चे प्रमाण वाढले आहे. नवं-नवीन तंत्रज्ञान आल्यामुळे गुडघे बदलण्याचा उपचारही सोपा आणि विनात्रासच झाला आहे. हि शस्त्रक्रिया बऱ्याच ठिकाणी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून हि केली जाते. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योज़ने च्या अंतर्गत गुडघ्याची वाटी बदलणे हि शस्त्रक्रिया उपलब्ध आहे, आपणास या योजने नुसार कोणते उपचार उपलब्ध आहेत हे सर्च करायचे / शोधायचे असेल, तर या लिंक वर जाऊन करू शकतात

महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी 2023

या एकत्रीकरणानंतर जे या योजना अंतर्गत उपचार उपलब्ध आहेत ते पाहणायसाठी खालील लेख बघा यात तुम्ही सोप्या पद्धतीने जो उपचार शोधायचा असेल तो शोधू शकाल.

आपणास जर आमचा हा लेख आवडला असेल, तर हि महत्वाची माहिती तुमच्या सर्व मित्र मंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा.
जेणेकरून तुमच्या जवळचे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *