उत्तम भाजी करण्यासाठी, भाज्या तयार करण्यापूर्वी हा सल्ला लक्षात ठेवा…

उत्तम भाजी करण्यासाठी टिप्स

जर तुम्हाला भाज्यांच्या सर्व पौष्टिक गुणांचा पूर्णपणे आनंद घ्यायचा असेल, तर भाज्यांची गुणवत्ता
आणि पाककला वाढवणाऱ्या पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे.

संतुलित आहारामध्ये भाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे कारण भाज्या विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण पोषक तत्वे आणि फायबर देतात.

तथापि, बर्‍याच लोकांना भाज्या अशा प्रकारे तयार करणे कठीण जाते. जेणेकरुन त्यांची चव आणि गुणवत्ता सुधारत असताना
त्यांची पौष्टिक सामग्री टिकेल.

विविध पद्धती आणि टिप्स चा वापर करून भाजीपाल्याची गुणवत्ता सुधारली जाऊ शकते, ज्यामुळे प्रत्येक घास स्वादिष्ट आणि पौष्टिक बनवू शकतो

भाज्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी

घरात भाज्या करताना त्याची गुणवत्ता सुधाण्यासाठी, कडवटपणा चिकटपणा आणि भाज्या चवदार किंवा खमंग करण्यासाठी,

भाज्या तयार करण्यापूर्वी हा सल्ला लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊयात:

उपाय

  • वांग्याची मोकळी भाजी करताना त्यात मेथी, धने. जिरे यांची पूड घालावी. भाजी खमंग लागते.
  • पालक शिजवून घेऊ नये. तो कच्चाच मिक्सरमधून वाटून घ्यावा. नंतर फोडणीला टाकावा. वाटताना दूध घातल्यास हिरवा रंग चांगला राहतो.
  • कारल्याची भाजी करण्यापूर्वी, कारली उकळताना मीठ, थोडी चिंच टाकून उकळून घ्यावी
    आणि कारल्याची भाजी करताना कारली चिरून अर्धा तास मीठ लावून ठेवावी.
    नंतर धुवून, तेलावर झाकण न ठेवता परतून घ्यावीत. कारल्याची भाजी करताना थोडी तुरटी घालावी म्हणजे कडूपणा कमी होतो.
  • कारल्याची भाजी करताना कारली फक्त पुसून घ्यावी व आत मसाला भरून मंद गॅसवर पाणी न घालता शिजवावी.
    कारल्याच्या फोडी तांदूळ धुतलेल्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवाव्यात. कडवटपणा कमी होतो.
  • वांगी चिरून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मीठ व हळदीची पूड घालावी. फोडी काळ्या पडत नाहीत.
  • वांगे भाजताना नेहमी प्रखर विस्तवावर भाजावे. मंदाग्नीवर भाजल्यास वांगे चिवट व टणक होते.
  • पालेभाज्या पीठ पेरून करावयाच्या असतील तेव्हा
    प्रथम भाजी चिरून, त्यात डाळीचे पीठ घालून तशीच शिजवून घ्यावी. नंतर लसूण, मिरच्या, तिखट घालून फोडणी द्यावी. भाजी चविष्ट होते.
  • भेंडीची भाजी करताना भेंड्यांना चिकटपणा येतो तो घालविण्यासाठी अर्धे लिंबू त्यात पिळावे.
    चिकटपणा जातो. हरभऱ्याच्या डाळीचे सार करताना त्यात विड्याची दोन पाने वाटून टाकावीत. सार चविष्ट होतो.

खाद्यपदार्थास स्वादिष्ट बनवणारे घटक

मुख्य खाद्यपदार्थाचा स्वाद वा रुची वाढविण्यासाठी अनेक उपपदार्थ उपयोगी ठरत असतात. सर्व पदार्थात मीठ महत्त्वाची भूमिका बजावते.
तिखट पदार्थात तर मिठाचा उपयोग होतोच परंतु काही गोड पदार्थात देखील मीठाचा वापर होतो.
अनेक स्वादिष्ट पदार्थांची चव वाढविण्याचे कार्य मीठ करते.
पण पदार्थात मीठाचे प्रमाण कमी वा जास्त असून चालत नाही. त्याचे प्रमाण ठरावीकच असावे लागते.
हे प्रमाण बिघडले तर मात्र पदार्थाची चव बिघडते. पदार्थ टिकवून ठेवण्यास मीठ उपयोगी पडते. याशिवाय तिखट, गरम मसाले, हळद, जिरे
/ मिरे / धने पावडर चिंच, लिंबू, पुदिना कढीपत्ता आदी पदार्थ सुद्धा पदार्थाचा स्वादिष्टपणा वाढविण्यास साहाय्य करतात. लवंग, वेलची,
जायफळ, तमालपत्र, केशर, शहाजिरे दाणे, दालचिनी हे पदार्थ गरम मसाल्यात समाविष्ट असतात.

खाद्यपदार्थ घट्ट किंवा दाट करणारे उपपदार्थ

कढी, आमटी, भाजीचा रस्सा, दुधाचे काही पदार्थ जास्त स्वादिष्ट बनविण्यासाठी किंवा पदार्थ जास्त पौष्टिक करण्यासाठी काही
उपपदार्थ वापरावे लागतात. नाहीतर पदार्थ दाटसर न बनता एकदम पातळसर पाणचट बनू शकतो.

अशा वेळी कोणी बाहेरचे पाहुणे जेवायला असतील तर मनातल्या मनात म्हणतील कसली फुळकवणी बनवली कोणास ठाऊक? म्हणून मुख्य पदार्थाचा दाटसरपणा वाढविण्यासाठी दाणेकूट, वाटलेला नारळ, वाटलेली कांदा पेस्ट, नारळाचा खव, बेसन, तांदळाची पिठी यांचा उपयोग होतो.

एकंदरीत काय

या पद्धतींचा वापर करून, तुम्ही तुमच्या भाजीपाल्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढवू शकता.
चवदार आणि पौष्टिक पदार्थ तयार करू शकता. नेहमी ताजेपणाला प्राधान्य द्या, भाज्या काळजीपूर्वक हाताळा आणि साठवा.
आणि थोडी कल्पनाशक्ती आणि काळजी घेतल्यास, तुम्ही सामान्य भाजी एका उत्तम पाणी चविष्ट पदार्थात बदलू शकता.
जे तुमच्या जिभेला आणि पोटाला तृप्त करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *