130 गमतीदार मराठी म्हणी | Marathi Mhani (2024)

Mhani in Marathi
मराठी म्हणी

दैनंदिन वापरत मराठी भाषेत बऱ्याच म्हणी वापरल्या जातात. त्यापैकी १३० म्हणी खालीलप्रमाणे

गमतीदार मराठी म्हणी: Funny Marathi Mhani

  1. जाळावाचून कड नाहीं; मायेवाचून रड नाहीं.
  2. ज्याचें जळें त्याला कळे.
  3. मऊ लागलें म्हणून कोपरानें खणूं नये.
  4. सदीचा चोर त्याच्या कमरेस दोर.
  5. आलें देवाजीच्या मना, तेथें कोणाचें चालेना.
  6. असतील बाळ तर फेडतील काळ.
  7. नकटे व्हावें पण धाकटे होऊं नये.
  8. आंधळ्याच्या गाई देव राखी.
  9. सासरा पाहुणा आला, म्हणून रेडा थोडाच दुभवता येणार आहे ?
  10. धन्या धत्तुरा, अन् चोरा मलिदा.
  11. जोवरी पैसा तोवरी बैसा.
  12. असेल हरी, तर देईल खाटल्यावरी.
  13. बुडत्याचा पाय खोलात.
  14. पदरी पडले, पवित्र झालें.
  15. ज्याच्या अंगी पाप, त्याला पोरे होती आपोआप.
  16. गोठणीवरच्या गाई श्यामभट दान देई.
  17. गोड करून खावं अन् मऊ करून निजावं.
  18. उंदराचा जीव जातो आणि मांजराचा खेळ होतो.
  19. गांवड्या गावांत गाढवी सवाशीण.
  20. जाती तशी. पुती आणि खाण तशी माती.
  21. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारटा.
  22. कुठे इंद्राचा ऐरावत अन् कुठें शामभट्टाची तट्टाणी.
  23. आगीतून फोफाट्यांत पडणें.
  24. चोर सोडून संन्याशाला सुळी देणें.
  25. साखरेचें खाणार त्याला देव देणार.
  26. कुत्र्याचें शेपूट नळीत घातलें तरी वाकडे ते वाकडेंच.
  27. दिव्याखाली अंधार.
  28. बाळाचे पाय पाळण्यांत दिसतात.
  29. देश तसा वेश.
  30. धर्म करतां कर्म उभे राहतें.
  31. शेळी जाते जिवानिशी खाणार म्हणतो वातड लागते.
  32. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.
  33. पिंडी ते ब्रह्मांडी.
  34. भुकेस कोंडा निजेस धोंडा.
  35. गळ्यांत माळा पोटांत काळा.
  36. चाळीशी लोटली आशा खुंटली.
  37. चोराला डसला विंचू तो करीना हूं का चूं.
  38. बडा झाला कामांतून गेला.
  39. तोंड वांकडे दैव फाकडे.
  40. मुंगीस मुताचा पूर.
  41. आपले खावें पण दुसऱ्यास द्यावें.
  42. खैरांचे झाड म्हाताऱ्याचे हाड.
  43. देणावळ तशीं धुणावळ.
  44. जळते घर, भाड्यानें कोण घेतो ?
  45. घासून घ्यावें पण हंसून घेऊ नये.
  46. देणें अन् दुखणें कोणाला सुटत नाहीं.
  47. माय मरो पण मावशी जगो.
  48. उद्योगाचे घरी ऋद्धिसिद्धि पाणी भरी.
  49. आशा सुटेना अन् देव भेटेना.
  50. तीन पूरभय्ये आणि तेरा चुली.
  51. खायला काळ अन् भूमीला भार.
  52. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
  53. फिरेल ते चरेल.
  54. आपले हात जगन्नाथ.
  55. नावडतीचें मीठ अळणी.
  56. कर्ज फार त्याला खाज नाहीं. उवा फार त्याला लाज नाहीं.
  57. चोरीचा मामला हळूहळू बोंबला.
  58. कान द्यावा पण कोन देऊं नयें.
  59. मेल्या म्हशीला पाच शेर दूध.
  60. बरी नव्हे थट्टा, भल्याभल्यास लावील बट्टा.
  61. लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून.
  62. धर्म करतां कर्म उभें रहातें.
  63. पिकल्याशिवाय विकत नाही.
  64. चमत्कार दाखविल्याखेरीज कोणी नमस्कार करीत नाहीं.
  65. विचंवाचे बिहाड पाठीवर
  66. रोज मरे त्याला कोण रडे
  67. कसायला गाय धार्जिणी
  68. हात दाखवून अवलक्षण करून घेणें
  69. नाकानें कांदे सोलणे
  70. बोलेल तो करील काय अन् गर्जेल तो पडेल काय ?
  71. ओढून ताणून चंद्रबळ आणणे
  72. विधवेने कुंकवाची उठाठेव कशाला करावी ?
  73. नाकापेक्षां मोती जड
  74. सोनारानेंच कान टोचावे लागतात
  75. खारट खोबरें खट्याळ गिन्हाईक
  76. दाम करी काम, बीबी करी सलाम
  77. घर फिरले म्हणजे वासेहि फिरतात
  78. काखेंत कळसा गांवाला वळसा
  79. सटवाईला नाहीं नवरा अन् म्हसोबाला नाहीं बायको
  80. वेळेवर वेळ शिमग्यावर खेळ
  81. छडी वाजे छमछम; विद्या येई घम घम
  82. येरे दिवसा भर रे पोटा
  83. शिमगा गेला तरी कवित्व शिल्लक रहातेच
  84. बुद्धि तशी फळें
  85. अन्न मारी अन्न तारी; अन्नासारखा नाहीं वैरी
  86. हपापाचा माल गपापा
  87. आप भला तो जग भला
  88. काल मेला व आज पितर झाला
  89. अडाणी कुणबी दुप्पट राबे
  90. अति रागा भाक मागा, त्याहून रागा देश त्यागा
  91. पायाची वहाण पायीं बरी
  92. मियां मूठभर अन् दाढी हातभर
  93. आई जेवूं घालीना अन् बाप भीक मागूं देईना
  94. जग हें अळवावरचें पाणी
  95. खायचे दांत निराळे अन् दाखवायचे दांत निराळे
  96. शेण जमिनीवर पडलें तर माती घेऊनच उठते
  97. पुष्पासंगे मांतीस वास लागे
  98. भोळा भाव सिध्दीस जाव
  99. घरोघरी त्याच परी
  100. मान सांगावा जगांत अन् अपमान ठेवावा मनात
  101. शिंक्याचें तुटलें की बोक्याचे साधते
  102. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्यानें वासरु मारु नये
  103. कांही दिवस सासूचे, तर कांही दिवस सुनेचे
  104. जाणाऱ्याचे जाते अन् कोठवळ्याचे दुखते!
  105. असतील शितें तर जमतील भुतें!
  106. जसे करावें तसें भरावें !
  107. शहाण्याला शब्दाचा मार
  108. कामापुरता मामा अन् ताकापुरती आजीबाई
  109. उपट मूळ अन् घे खांद्यावर
  110. आपल्या पायाखाली काय जळतें ते आधीं पहावें
  111. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
  112. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊं नये
  113. नांव मोठे अन् लक्षण खोटे
  114. जातीसाठी खावी माती
  115. भरली मूठ सव्वा लाखाची
  116. सुक्याबरोबर ओलेही जळते
  117. हत्तीचे दात दाखवायचे निराळे, खायचे निराळे
  118. भुकेला कोंडा, झोपेला धोंडा
  119. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार ?
  120. भिंतीलाही कान असतात
  121. परदुःख शीतळ असते
  122. दूरून डोंगर साजरे
  123. ताडाच्या झाडाखाली बसून दूध प्याले तरी लोक ताडीच समजतात
  124. तेरड्याचा रंग तीन दिवस
  125. तुझे माझे जमेना, तुझ्याशिवाय गमेना
  126. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाहीं
  127. जैसे करावे, तसे भरावे
  128. गाजराची पुँगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली
  129. गाढवाला गुळाची चव काय ?
  130. कावळ्याच्या शापने गाय मरत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *