रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा आणि आदर्श सण आहे जो भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे आणि घट्ट बंधनाचे प्रतीक आहे.
हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
रक्षाबंधनाचे महत्व / राखी पूर्णिमा
रक्षाबंधनाचा अर्थ ‘बंधन संरक्षणाचे’ असा आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या ऊजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते,
म्हणजे भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो आणि तिला नेहमीच बहिणीला साथ देतो.
या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर आदराने राखी बांधते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.
हा बंध त्यांच्या प्रेमाचा एक नवीन क्षण निर्माण करतो जो आयुष्यभर टिकतो. रक्षा-बंधन म्हणजे प्रेम-बंधन.
भाऊ बहिणीचे मिलन म्हणजे पराक्रम व प्रेम तसेच साहस संयमयांचा सहयोग.
रक्षाबंधन म्हणजे दृष्टी परिवर्तन
रक्षा-बंधनाचा उत्सव म्हणजे दृष्टि परिवर्तनाचा सण. बहिणीने हातात राखी बांधताच भावाची दृष्टी बदलून जाते.
तिच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वतःवर घेतो. भावाला राखी बांधण्याच्या पूर्वी बहीण त्याच्या कपाळाला टिळा लावते.
ही केवळ भावाच्या मस्तकाची पूजा नाही तर भावाचे विचार व बुद्धी यांच्यावरील विश्वासाचे दर्शन आहे.
भावाच्या हातात राखी बांधून बहीण त्याच्यापासून केवळ स्वतःचे रक्षण इच्छिते असेच नाही,
तर समस्त स्त्री जातीला स्वतःच्या भावाचे रक्षण मिळावे अशी इच्छा करते.
रक्षाबंधन गोष्ट आणि मान्यता
वेदामध्ये देवासुर-सेमामात देवांच्या विजया निमित्त इंदाणीने हिम्मत हरलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती असा उल्लेख आहे.
अभिमन्यूचे रक्षण करणाऱ्या कुन्तीमातेने त्याला राखी बांधली होती,
तर स्वतःच्या रक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायुनाला राखी पाठविली होती.
राखी बांधताना बहीण भावाला बांधते म्हणजे त्याच्या ध्येयाचे रक्षण करायला सुचवते.
असले सुंदर प्रेमबंधनाचे, भावबंधनाचे पर्व कुटुंबापुरतेच मर्यादित राखणे योग्य नव्हे.
अशा पर्वाचे तर सामाजीकरण आणि वैश्वीकरणकेले पाहिजे. सख्या भावाबद्दलची कुणाही बहिणीची दृष्टी निर्मळ,
प्रेमानेभरलेली असतेच, गरज आहे समाजात स्त्रीकडे पाहाणारी विकारी दृष्टीबदलण्याची.
सख्खी बहीण सख्या भावाला राखी बांधते त्यापेक्षा समवयस्क दुसरी कुणी बहीण दुसऱ्या भावाला राखी बांधील तर त्यात बुद्धिमत्तेची पराकाष्टा आहे.
कौटुंबिक महत्व
रक्षाबंधन हा सांस्कृतिक भाग असण्यासोबतच एक कौटुंबिक आणि सामाजिक सण देखील आहे.
या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि खास खाण्यापिण्याचा आस्वाद घेतात. तसेच,
या दिवशी एकमेकांपासून लांब राहणारे भाव बहिणीची भेट होते आणि त्याच्यातील जिव्हाळा वाढतो.
त्याचबरोबर हा सण भाऊ-बहिणीमधील प्रेम आणि परस्पर संबंध दृढ करतो. या सणाच्या माध्यमातून आपल्याला कळते की,
कुटुंबाचा प्रेम आणि सहवास किती महत्त्वाचे आहे आणि आपण एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे.
थोडक्यात
रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहाण्याची दृष्टी बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी.
रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा अस्खलित वाहणारा झरा! भाऊ व बहीणपरस्पर प्रेरक, पोषक व पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे.
नारळी पौर्णिमा (श्रावण पौर्णिमा) / राखी पौर्णिमा
समुद्रकाठी राहणारे लोक प्रामुख्याने हा सण साजरा करतात.
जलदेवतेची पूजा
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. बोटी, जहाजे, वगैरेची ये-जा या काळात बंद असते.
जलदेवतेचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून यादिवसापासून समुद्र शांत व्हावा व बोटी वगैरे चालू व्हाव्यात,
यादृष्टीने लोक जलदेवतेची पूजा करतात. काही लोक नारळ अर्पण करताना तांब्याची नाणी नारळास बांधून अर्पण करतात.
काही लोक रुप्याची नाणी बांधतात. कोणी साधा नारळ समुद्रात सोडतात. कोणी बेगडाचा नारळ समुद्रात सोडतात.
श्रावण पौर्णिमा
फार पूर्वी आश्रमात गुरूंकडे शिकणारे शिष्य या दिवशी ‘श्रावणी’ नावाचा विधी करायचे.
भूतकाळात कळात नकळत घडलेल्या पापांबद्दल देवाची माफी मागत, जीवनाची नवीन चांगली सुरवात करण्याची प्रतिज्ञा करायचे.
नवीन यज्ञोपवीत (जानवे) धारण करीत असे. त्यामुळे या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करतात.
सामान्य प्रश्न – FAQ
हिंदू कॅलेंडर प्रमाणे यावेळी राखीपौर्णिमा हि बुधवार 30 ऑगस्ट 2023 रोजी आहे. राखी पौर्णिमा ची तिथी हि 30 ऑगस्ट 2023 दुपारी 12:29 पासून 31 ऑगस्ट 2023 सकाळी 8 वाजून 35 मिनिटा पर्यंत आहे. भद्राकाळात शक्यतो राखी बंधू नये
यावेळी या दिवशी भद्राकाल तयार होत आहे. आणि भद्राकाळात राखीपौर्णिमा साजरी करू नये अशी मान्यता आहे. म्हणजेच रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त हा बुधवार 30 ऑगस्ट 2023 रोजी ला रात्री 09:01 पासून गुरुवारी 31 ऑगस्ट 2023 सकाळी 07:01 आहे.
या दिवशी बहिणीने आपल्या भावाला राखी बांधावी. भावाने बहिणीचे रक्षण करावे असा या राखी बांधण्यामध्ये हेतू असतो. रक्षाबंधनाचा अर्थ ‘बंधन संरक्षणाचे’ असा आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या ऊजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते, म्हणजे भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो.