श्री रामनवमी (चैत्र शुद्ध नवमी)
अयोध्येचा राजा दशरथ व त्याची थोरली राणी कौसल्या, यांना शुद्ध नवमीला भर दुपारी कडाकडत्या उन्हात बारा वाजता
युगकर्ता पुत्र श्रीरामचंद्र झाला, म्हणून या नवमीला’ रामनवमी’ म्हटले जाते.
रामाचा वनवास
महापराक्रमी, सत्यवचनी, त्यागी व उच्च-नीच असा भेदभाव न मानता सर्वांवर उत्कट प्रेम करणाऱ्या पण दुष्टांचा संहार करणाऱ्या श्री रामाने,
त्याचे वडील दशरथ यांनी त्यांची धाकटी राणी कैकयी हिला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी राजवैभवाकडे पाठ फिरवून चौदा वर्षांचा वनवास पत्करला.
या वनवासात श्रीरामाने अनेक अत्याचारी राक्षसांना ठार मारले व ऋषीमुनींना भयमुक्त केले.
पंचवटीस मुक्काम असताना सीतेला कपटाने पळवून नेणाऱ्या रावणाचा नि:पात करून, सीतेला सोडवून आणण्यासाठी
श्रीरामाने वानरांचे म्हणजे वन्य जमातीतील लोकांचे साहाय्य घेतले, समुद्रावर सेतू बांधून व लंकेत प्रवेश करून रावणादि राक्षसांचे कंदन केले व
सीतेला मुक्त केले. नंतर अयोध्येस परत येऊन त्याने राज्य इतके आदर्श केले की,
तेव्हापासून आदर्श राज्याला ‘ रामराज्य ‘ असे म्हटले जाऊ लागले.
रामणयाचे महत्व
कौसल्येचा पुत्र श्रीराम, सुमित्रेचे पुत्र लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकयीचा पुत्र भरत, या चौघा भावांचं जसं एकमेकांवर असीम प्रेम होतं,
तसंच सीतेचं श्रीरामावर व रामाचं सीतेवर प्रेम होतं. हनुमंताची श्रीरामाच्या ठिकाणी असलेली निष्ठाही अमर्याद होती.
म्हणूनच महर्षि वाल्मिकींनी या अलौकिक व्यक्तींवर रामायण लिहिलं आणि ते जगातील सर्व महाकाव्यांत सर्वात श्रेष्ठ ठरलं.
‘श्री’च्या मागोमाग ‘ग’ येतोच. या रामायणाचा प्रभाव केवळ हिंदु व बौद्ध धर्मियांवरच पडला आहे असे नव्हे,
तर आशिया खंडातील इंडोनेशिया व इतर काही इस्लामी राष्ट्रांवरही पडला आहे.
आशिया खंडातील प्रत्येक राष्ट्रातील भाषेत रामायण लिहिले गेले असून, त्याचा तिथल्या जनमानसावर अतिशय प्रभाव पडला आहे.
तिथे रामायणातील कथानकांवर अजूनही नाटके व काव्ये केली जात आहेत. म्हणून रामायणाचा मुख्य नायक श्रीराम,
याच्या जन्मदिनी हिंदुस्थानातील जवळजवळ प्रत्येक गावातील एखाद्या तरी मंदिरात रामजन्म मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो.
रामराज्य
आपल्या जीवनात राम पूर्णतः एकरूप झाला आहे. भारतातील गावात जर दोन लोक एकमेकासमोर आली कि ‘राम राम’ म्हणतात.
प्रभू विश्वासावर चालणार माणूस, कार्य किंवा एखादी संस्था यासाठी ‘राम भरोसे’ हा शब्दप्रयोग प्रचलित आहे. ‘घटाघटांत राम भरलेला आहे’
हा शब्द समूह ईश्वराच्या सर्व व्यापकतेचे दर्शन घडवितो. कोणत्याही सुव्यवस्थित व संपन्न राज्यव्यवस्थेसाठी ‘रामराज्य’ शब्द पर्याय म्हणून वापरला जातो.
श्री रामाचे गुण
- कौटीबीक आदर्श, रामाला तीन भाऊ होते पण कधी त्यांच्यात भांडण झाले असे कधी आपण ऐकले नाही.
मातृपितृ भक्ती, पित्याच्या वनवासात जाण्याच्या आज्ञेचं पालन कोणतेही दुःख किंवा का कु न करत करतो. - मैत्रीचं आदर्श, राम सुग्रीवाची मैत्री हि सर्वासाठी आदर्श आहे.
- शत्रूकडून कौतुक, मारीच रामाची उदारता आणि चांगुलपणा सांगताना म्हणतो “मित्र असो कि शत्रू तो रामासारखा असावा”.
रावणाच्या मृत्यू नंतर त्याचे अग्निसंस्कार करायला विभीषण नकार देतो, त्यावेळी राम त्याला सांगतो, “मरणाबरोबर वैर संपते,
तर भाऊ म्हणून तू हे करा, नाही केलं तर मी करेल.
तो जसा तुझा भाऊ आहे तसा माझा हि भाऊ आहे. - साध्वी स्त्रियांची इच्छा रामासारखा पती मिळावा हि असते, रामाचं सीतेवर असलेले अलौकिक आणि अमर्याद प्रेम आपण सर्व जाणून आहातच.
- रामाला आपली जन्मभूमी फारच प्रिय होती, वालीला मारल्यावर तो किष्किंधेच राज्य सुग्रीवाला देतो,
आणि रावणाला मारल्यावर लंका विभीषणाला देतो. हि राज्य सुंदर समृद्ध होती पण रामाला त्याचा कधी मोह झाला नाही