घराच्या दरवाजाला उंबरठा का असावा?

उंबरठा

घराच्या दाराला असलेल्या उंबरठ्याचे पूजन करणे हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. घराच्या दराचा उंबरठा हा रक्षण करणारा आहे. पूर्वी असाही समज होता की, एखाद्या व्यक्तीची येण्याची वेळ निघून गेल्यानंतरही ती व्यक्ती घरी आली नाही म्हणजे यायला खूप उशीर लागतं असेल. किंवा एखादी व्यक्ती लवकर घरी यावी असे जर वाटत असेल, तर उंबरठ्यावर थोडे मीठ ठेवले जायचे किंवा एखादे फुलपात्र उंबरठ्यावर पालथे ठेवले जातं असे.

घराची लक्ष्मण रेषा म्हणजे उंबरठा. दारात आलेल्या व्यक्तीला बाहेर ठेवायचे की घरात घायचे ही ठरवण्याची जागा ही उंबरठा असते. एखादी व्यक्ती जेव्हा उंबरठ्यावर पाऊल टाकत टाकते तेव्हा तो एक मुक साक्षीदार असतो.

उंबरठा हे मर्यादेचे प्रतीक

उंबरठा हे मर्यादेचे प्रतीक आहे. घराचे घरपण जपण्यासाठी अनेक मर्यादांचे पालन करावे लागते. हा उंबरठा घरातील भावना घरातच ठेवून बाहेरचे व्यवहार बाहेर ठेवतो. मराठीत उंबरठ्याला मर्यादेची उपमा दिली जाते. कोणी जर मर्यादा सोडत असेल तर त्याला उंबरठा ओलांडू नको अशी म्हण आहे. आपल्या जीवनात विचार, विकार, वाणी, वृत्ती आणि वर्तन यावर काही मर्यादा असाव्यात. ऋषींनी व आचार्यांनी वेदमान्य विचार सांगितले आहेत. ते आचारणात आणले पाहिजे. विकारांवरही बंधन असले पाहिजे. अनिर्बंध विकार व्यक्ती व समाज दोघांचेही स्वास्थ्य नष्ट करतात.

वाणी मर्यादने शोभणारी असली पाहिजे. अनियंत्रित वाणी अनर्थ निर्माण करते, तर सुनियंत्रीत वाणी पृथ्वीवर स्वर्गदेखील निर्माण करू शकते. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या जीवनात या सर्व मर्यादांचे पालन केले होते. म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात.

उंबरठ्यावर श्री नरसिंह लक्ष्मी देवतेचे स्थान

उंबरठ्याचा बाहेरचा भाग सौर ऊर्जेचे, आतील भाग चंद्र उर्जेचे आणि मधला भाग पृथ्वीच्या उर्जेचे संतुलन राखतो. घरात आलेल्याची बातमी देणारा, वैभव व चारित्र्यरक्षक, लक्ष्मण रेषा व मर्यादा पालनाचा प्रेरक असा उंबरठा प्रत्येक दाराला हवाच आणि गृहलक्ष्मीने उंबरठयाचे पूजन करून अशी प्रार्थना करायची की, हे प्रभो, माझ्या दारात सैतानाचे नाही तर संताचे स्वागत व्हावे. तसेच दारिद्रयाचे नाही तर लक्ष्मीचे पूजन व्हावे आणि माझे घर है भोगाने होणाऱ्या भितीने नाही तर प्रसादाने प्राप्त होणा या प्रसन्नतेने व्यापलेले असावे. धर्मशस्त्रानुसार उंबरठ्यावर श्री नरसिंह लक्ष्मी देवतेचे स्थान मानले आहे. तर चौकटीच्या वर विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्थान आहे. त्यामुळे उंबरठ्यावर शिंक येणे हे अयोग्य मानले जाते.

अलीकडे घराला उंबरठा लावण्याची पद्धत बंद होत चालली आहे परंतु ती पुन्हा चालू करण्याबाबत बिल्डर्सना आग्रहाने सांगण्याची वेळ आली आहे. कारण उंबरठयामुळे अनेक पिडा बाहेरच्या बाहेर अडवल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *